पश्चिम महाराष्ट्र

सातारा, कऱ्हाड कोरोनाच्या चक्रव्यूहात; दाेन वर्षीय मुलीचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर, आगाशिवनगर येथील आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आज (गुरूवारी) आलेल्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या वाढून 74 झाली आहे. बधितांची संख्या वाढू लागल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सातारा येथे देखील एकास काेराेनाची बाधा झाली आहे. 

कऱ्हाड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढु लागले आहे. तालुक्यात पहिला रुग्ण तांबवे येथे सापडला. त्यानंतर म्हारुगडेवाडी येथे मुंबईवरुन आलेला रुग्ण सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्य झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अन्य एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर हजारमाचीत रेल्वेचा कर्मचारी बाधीत म्हणुन सापडला. त्यानंतर चरेगाव आणि बाबरमाची येथे दोन रुग्ण सापडले. त्यानंतर तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर दोन्ही ठिकाणची कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संबंधित ठिकाणी कोरोनाची साखळीच सुरू झाल्याचे दिसत आहे. तेथील रुग्ण सर्वाधिक असल्यामुळे दोन्ही ठिकाण कोरोनासाठी हॉटस्पॉटच झाली आहेत. आज (गुरूवारी) आणखी दोन रुग्णांची वाढ झाली त्यामध्ये मलकापूर,  आगाशिवनगर येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता आणखीच वाढली आहे. संबंधित ठिकाणी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांच्यासह आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रनेणे आवश्यक ती उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणारी दाेन वर्षीय मुलगी व 68 वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारी 70 वर्षीय महिला अशा एकूण तीन निकट सहवासितांचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील एक, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 व उपजिल्हा रुग्णालय,फलटण येथील 10 असे एकूण 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

130 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

सहा मे रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे 7, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 102, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 21 असे एकूण 130 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातून मूळ गावी जायचंय ? माेफत रेल्वे प्रवासास काँग्रेसचा हात

काहूर माजवून राहिला तरी कोडं उलगडनासं झालंय

धक्कादायक : वाढदिवसादिवशीच चौदा वर्षांची मुलगी कोरोनाबाधित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT