भुईंज : पुणे-बंगळूर महामार्गावर उडतरे गावानजीक सेवा रस्त्यावर बिअरची बाॅक्सची वाहतूक करणारा मालट्रक चालकाचा ताबा सुटून पलटी झाला. या अपघातात कोणीही जखमी नाही, परंतु लाखो रुपयांची बिअर सेवारस्त्यावर वहात होती.
याबाबत घटनास्थळावरुन तसेच भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (गुरुवार) सकाळी साडेनऊ वाजता मालट्रक क्रमांक एमएच 11 एएल 5250 साताराच्या दिशेला चालला हाेता. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने सेवा रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु ट्रकमधील बिअरचे बाॅक्स रस्त्यांवर पडले. काही बिअरच्या बाटल्या फुटल्या. त्यामुळे रस्त्यावर बिअरचा घमघमाट सुटला. या अपघातात लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातानंतर भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी महामार्गावरील वाहतुक सुरुळीत केली.
Video : जे तमिळनाडूने केले तेच महाराष्ट्र सरकारनेही करावे
उत्पादन शुल्क कार्यालयास गृह मंत्र्यांनी नेमके काय आदेश दिलेत वाचा सविस्तर
...म्हणून अभियंत्यांनी आपले जीवन संपवले
Video : आजचा दिवस त्यांच्यासाठी जणू दिवाळीच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.