मेढा/म्हसवड ः लॉकडाउनमुळे गावी जाता न आल्याने एकटेपणातून आलेल्या नैराश्यातून दोन अभियंत्यांनी मंगळवारी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. डांगरेघरातील (ता. जावळी) युवकाने आई-वडिलांच्या आठवणीने नवी मुंबईतील कोपरखैरणमध्ये, तर दुसऱ्याने म्हसवडमध्ये जीवनयात्रा संपवली. हा तरुण तामीळनाडूतील मंगालीनगर येथील रहिवाशी आहे. सूरज सखाराम सुर्वे (वय 27) व आरमारी मुतू (वय 36) अशी मृतांची नावे आहेत.
सातारा-मोहोळ या केंद्रीय महामार्गाच्या कामावरील अभियंता आरमारी मुतू (वय 36, रा. मंगालीनगर, ता. अरुमबक्कम, जि. चेन्नई) यांनी येथील भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
पोलिसांनी सांगितले, की येथील अब्दागिरे बिल्डिंगच्या पाठीमागील घरामध्ये आरमारी मुतू हे राहात होते. ता. 20 मार्च रोजीच त्यांनी अभियंतापदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ता. 22 मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने त्यांना आपल्या घरी जाता आले नाही. तेव्हापासून ते घरी एकटेच राहात होते. चेन्नईला जाण्यासाठी ऑनलाइन परवानगी घेऊन त्यांनी वाहनही बूक केले होते. मंगळवारी सकाळी ते आपल्या गावी मंगालीनगरला जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी खोलीतील छताच्या पंख्याला शर्टने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कुंभार तपास करीत आहेत.
दरम्यान लॉकडाउनमुळे नवी मुंबई येथे अडकलेल्या डांगरेघरच्या (ता. जावळी) अभियंत्या तरुणाने कुटुंबीयांच्या आठवणीने व्याकूळ होऊन राहत्या खोलीतच गळफास घेऊन मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. नवी मुंबईतील कोपरखैरण सेक्टर चार परिसरात ही घटना घडली.
जावली : लॉकडाऊनला कंटाळून इंजिनिअर तरूणाची मुंबईत आत्महत्या
सूरज सुर्वे हा लॉकडाउन लागू झाल्यापासून घरी एकटाच राहात होता. त्याचे सर्व कुटुंबीय हे गावी होते. तो अभियंता असून, ऐरोलीतील कंपनीत नोकरीला होता. मोठा भाऊ व वाहिनींसोबत तो राहात होता. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर त्याचे दादा व वहिनी गावी आले. सूरजचे आई-वडीलही गावालाच असतात. त्यामुळे सर्व जण गावी, तर तो एकटाच कोपरखैरणेत अडकला होता. लॉकडाउन वाढतच गेल्याने तो घरी एकाकी होता. शेजारचे त्याला जेवण देत होते. मंगळवारी त्याला नेहमीप्रमाणे शेजारी जेवण घेऊन गेले असता दरवाजा बंद होता. दरवाजा न उघडल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. दरवाजा तोडल्यानंतर सूरजचा मृतदेह आढळून आला. गळफास लावून त्याने आत्महत्या केली होती.
सूरजचे वयोवृद्ध आई-वडील हे गावी शेती करतात. मोठ्या भावाचा कोपरखैराणे येथे फोटोचा व्यवसाय आहे. सूरज हा फोनवरून नेहमी घरच्यांशी बोलत होता. स्वभावाने तो शांत होता. गावाला सण, उत्सव व कार्यक्रमाला तो नेहमी येत होता. त्याच्या निधनाने गावावरच शोककळा पसरली. या घटनेची नोंद कोपरखैराणे पोलिस ठाण्यात झाली आहे.
कुटुंबीयांच्या आठवणीने व्याकूळ
लॉकडाउनला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सूरजने चिठ्ठीत लिहिले आहे. लाकडाउनमुळे घरी एकटाच असल्याने घर खायला उठत आहे. घरच्यांची सतत आठवण येते; परंतु भेट होऊ शकत नाही. लॉकडाउन आणखी किती वाढेल, याचीही खात्री नाही. त्यामुळे आत्महत्या करत आहे, असा मजकूर चिठ्ठीत लिहिला आहे.
चिंताजनक : खटाव पाठाेपाठ माणमध्येही कोरोनाची धडक; कऱ्हाड नव्वदीत
दारू दुकाने सुरु करण्यापुर्वी हे करा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश
केशरी रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.