पश्चिम महाराष्ट्र

जिवाची बाजी लावून लढणारेच पॉझिटिव्ह; याला जबाबदार कोण ?

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना विरुद्धच्या संघर्षात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी अक्षरशः जिवाची बाजी लावून लढत आहेत; परंतु या "कोरोना फायटर्स'च्या सुरक्षिततेबाबत पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याने जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचरिका आणि कर्मचारी हादरून गेले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाविरुद्धची उपचार यंत्रणा सक्षम ठेवायची असेल, तर जिल्हा रुग्णालयातील सर्वांची अत्यंत काळजी घेणे आवश्‍यक आहे.
 
जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे स्वॅप घेणे, बाधितांवर उपचार करणे यामध्ये जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांची सूंपर्ण टीम अत्यंत महत्त्वाचे काम करते आहे. निम्म्योपक्षा जास्त जिल्ह्यातील रुग्णांचा भार या ठिकाणची "टीम' सक्षमपणे पेलत आहे. जिल्हा रुग्णालयातील "टीम' बाधित झाली, तर कोरोनाच्या उपचाराच्या सिस्टिममध्ये नक्कीच बिघाड निर्माण होणार आहे. त्यामुळे या "टीम'ची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाचे आहे; परंतु या "टीम'ची पाहिजे तेवढी सुरक्षितता घेतली जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
 
जिल्हा रुग्णालयातील एक्‍स रे तंत्रज्ञ असलेल्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोना श्‍वसनाशी संबंधी आजार आहे. त्यामध्ये रुग्णाच्या छातीतील संसर्गाचे प्रमाण तपासण्यासाठी एक्‍स रे काढण्याचीही आवश्‍यकता असते. त्यांना कोरोना बाधितांच्या, तसेच संशयितांचाही एक्‍स रे काढावा लागतो. अशा परिस्थितीत एक्‍स रे तंत्रज्ञानांही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना स्वसंरक्षणाची चांगल्या दर्जाची सुविधा उपलब्ध होणे आवश्‍यक असते; परंतु अगदी तुटपुंज्या संरक्षणाच्या साधनात त्यांना काम करावे लागते आहे. वास्तविक कोरोना संसर्गाचा विचार करता तंत्रज्ञांना पीपीई किट देण्याची आवश्‍यकता होती; परंतु त्याची उपलब्धता न झाल्यानेही जिल्हा रुग्णालयातील तंत्रज्ञ बाधित झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्गाची बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रुग्णालयातील काही कर्मचारी क्वारंटाइन करावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवेतही खंड पडणार आहे. ती भरपाई कशी करणार असाही प्रश्‍न आहे.
 
रुग्णालयाबरोबरच सातारा शहरात नसलेला कोरोनाचा रुग्ण यामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला प्रतिबंधक झोनमध्ये जावे लागले आहे. शहरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार काळजी घेण्याचे, घरातच  हण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केल जात आहेत. मात्र, जर प्रशासनाच्या त्रुटीमुळे एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह होणार असेल, तर त्याला जबाबदार नेमके कोण असा प्रश्‍नही या निमित्ताने निर्माण होतो आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांबरोबरच सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, त्या वॉर्डमधील कपडे धुणारे कर्मचारी या सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार होणे आवश्‍यक आहे; परंतु तो तेवढ्या गांभीर्याने होत नसल्याची परिस्थिती आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांच्याही तक्रारी आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालावे... 

उद्योजकांना कामगार कंपनीतच ठेवा म्हणून सांगणाऱ्या प्रशासनाला या वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्यांच्या निवासाची व्यवस्था अद्याप करता आली नाही. त्यामुळे नियम फक्त इतरांना. आपण मात्र, न्यायच रेटून असा कारभार सर्वसामान्य नागरिकाला कोरोनाच्या कचाट्यामध्ये आणणारा ठरू शकतो. त्यामुळे या प्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करणे आवश्‍यक बनले आहे.

अडचणीतील मुख्यमंत्र्यांच्या मदतीला बाबा धावले

आधी लाॅकडाऊन, आता अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांसह ग्रामस्थही हतबल

काय सांगता ! दारू दुकानच अनलॉक व्हयं

सातारा : पाच आरोग्य सेविका, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा; पन्नाशीत जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT