वाई (जि.सातारा) : कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात पुढील सहा महिन्यांसाठी न्याय ही योजना लागू करावी, ज्यामधून शहरी व ग्रामीण भागातील गरजूंना प्रति महिना 6000 रुपये मिळावेत आणि ग्रामीण भागामध्ये मनरेगा योजनेचा लाभ दुप्पट व्हावा, अशी मागणी सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी वाई तालुक्यात अभिनव आंदोलनात्मक उपक्रम राबविला.
भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत शिंदे यांनी केंद्र सरकारने न्याय योजना लागू करावी, यासाठी वाई तालुक्यातील मांढरदेव, बालेघर, कासुर्डेवाडी, अनपटवाडी, गडगेवाडी, बिवजेवाडी, कोचळेवाडी, सोमेश्वरवाडी, वेरुळी, डुईचीवाडी या डोंगर पठारावरील गावांमध्ये जाऊन शेतकरी मजूर व गरीब कुटुंबांना "एक दिवसाचा न्याय' या आंदोलनात्मक उपक्रमाद्वारे गरजू लोकांना एक दिवसाची रुपये 200 मदत तसेच दीडशे कुटुंबीयांना 1300 रुपयांचे अन्नधान्य स्वरूपात किट उपलब्ध करून दिले. तसेच न्याय योजनेचा फायदा गोरगरीब कुटुंबांसाठी कशा पद्धतीने उपयुक्त आहे व रोजगारनिर्मिती कसे होऊ शकते, हे नागरिकांना युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सांगण्यात आले.
यावेळी मांढरदेव देवस्थानचे विश्वस्त जीवन मांढरे, राजगुरू कोचळे, उपसरपंच अजित मांढरे, परशुराम मांढरे, शंकर मांढरे, विशाल मांढरे, चंद्रकांत सूर्यवंशी, बाळासाहेब कोंडके, दत्तात्रय सपकाळ, श्रीकांत कोचळे, शशिकांत कोचळे, प्रकाश मांढरे, अण्णा शिंदे, वेरुळीचे विशाल मांढरे, सरपंच दादासाहेब मांढरे, उपसरपंच नितीन मांढरे, सुनील कांबळे, परखंदीचे अभिजित शिंदे, सचिन गाढवे, विशाल गाढवे, शुभम शिंदे-पाटील, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, ग्रामस्थ, युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाईला धक्का : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आठवा बळी
चर्चाच चर्चा विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा : कॉंग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्यास संधी मिळणार का ?
शेतकरी, मजुरांना सरकाराने पगार द्यावा माजी मुख्यमंत्र्यांची मागणी
लढा कोरोनाचा : काळजी करु नका, बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर आहे असे डाॅक्टरांनी सांगताच सर्वांचे चेहरे खूलले
सातारा जिल्ह्यात चार हजार आयटीआयधारकांना राेजगाराची संधी; कृतीची आवश्यकता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.