पश्चिम महाराष्ट्र

` या ` निवडणुकींच्या मतपत्रिकेवरही आता मालक...दादा..काका..भय्या

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : टोपण नाव अथवा विशेष नावाने प्रसिद्ध असलेल्यांना निवडणूक लढविताना मतपत्रिकेवर संबंधिताचे नाव उपाधी किंवा विशेष नावासह प्रसिद्ध करण्याचा निर्णय  महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. लोकसभा, विधानसभेसाठी असलेली ही सुविधा आता आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी नुकतेच या संदर्भातील
आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांना पाठवले आहेत. 

उमेदवार असतात आग्रही
निवडणुकीच्या मतपत्रिकेवर आपले नाव विशिष्ट पद्धतीनेच छापले जावे, नावापुढे मालक, भैया, काका, दादा या उपाधी आवर्जून असाव्यात यासाठी उमेदवार आग्रही असतात. या पद्धतीने नावाचा उल्लेख करण्याची सुविधा लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होता. तो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही लागू करण्यात आला आहे. 

मालक, दादा, काका, भय्याची चलती
शैक्षणिक पात्रतेएेवजी मालक, दादा, काका आणि भय्या या उपाधी सहज मिळून जातात. त्यामुळे नेत्यासोबत फिरणाऱ्या व्यक्तीकडून तसा प्रचार सुरु होतो आणि त्या पद्धतीनेच संबंधित व्यक्तीची अोळख निर्माण होते. त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार उपाधी मिळवणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असते. आज प्रत्येक गावात गेले की त्या ठिकाणी मालक आणि दादा तर हमखास भेटतात. उद्या ते निवडणुकीत रिंगणात उतरले तर त्यांच्या नावासमोर मालक किंवा दादा असा उल्लेख असल्यास त्यात आश्चर्य राहणार नाही.  

म्हणून केली ही सुविधा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे अर्ज संगणकावर भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. तो अर्ज भरताना काही वेळा उमेदवाराकडून टंकलेखनाच्या चुका होऊ शकतात. काही उमेदवार हे मूळ नावापेक्षा विशेष नावानेच प्रसिद्ध असतात. असे उमेदवार मूळ नावासह टोपणनावही मतपत्रिकेवर असावे, यासाठी आग्रही असतात. तशी मागणी झाल्यास आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बदल केला जाणार आहे. मात्र त्यासाठी संबंधित उमेदवारास ही मागणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवसापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी करावी लागणार आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम मतपत्रिकेत तसा उल्लेख करणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT