केम (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील केम येथे तयार होणाऱ्या कुंकवाला देशभरातून मागणी असते. सध्या संक्रांतीचा सण असल्याने येथील कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हळदी, कुंकू तयार करण्यासाठी कामगारांची लगबग सुरू आहे. हळदी, कुंकू तसेच काही कारखान्यांमध्ये रांगोळ्यांचे वेगवेगळे रंग तयार केले जातात. विशेषतः हळकुंडांपासून तयार केलेल्या कुंकवाला सर्वांत जास्त मागणी आहे.
हेही वाचा - अश्लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!
केमच्या कुंकूला देशभरातून मागणी
या पारंपरिक व्यवसायाला सुमारे शंभर वर्षांची परंपरा आहे. गावाच्या भोवताली अनेक कारखाने असून, या कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या कुंकवाला वर्षभर तर मागणी असतेच, पण संक्रांत हा सण हळदी-कुंकवाचा असल्याने सध्या येथून कुंकवाची लक्षणीय निर्यात होत आहे. स्त्रियांच्या कपाळावरील कुंकू हे सौभाग्याचा अलंकार समजला जातो. संक्रांतीचा सण हा देशभरामध्ये महत्त्वाचा समजला जातो. हा सण मुख्यतः हळदी-कुंकवाचा सण म्हणून सगळीकडे ओळखला जातो. म्हणून केममध्ये तयार होणाऱ्या हळदी-कुंकवाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
मजुरांच्या हाताला मिळतेय काम
या कालावधीमध्ये इतर वेळेपेक्षा पाच ते सहा पटीने अधिक हळदी-कुंकवाचे उत्पादन येथील विविध कारखान्यांमध्ये घेतले जाते. त्यामुळे येथे पुरेसा मजूर वर्ग उपलब्ध असून, मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. उजनी जलाशयाच्या निळ्याशार पट्ट्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलेल्या केम या गावामध्ये हिरवीगार शेती व केमच्या अवतीभोवती वाळत असलेले हळदी-कुंकवाचे वाळवण यामुळे येथील भाग हा या दिवसामध्ये विविधरंगी होऊन गेला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.