Sangli Politics esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : चंद्रहार पाटलांचा पराभव करणाऱ्या खासदार विशाल पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Shiv Sena chief Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करून विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकली.

सकाळ डिजिटल टीम

आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत. त्यात दोन काँग्रेसचे, तीन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार आहेत.

सांगली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल काँग्रेस नेते, आमदार विश्‍वजित कदम, खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी दिल्लीत भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघावरून झालेल्या ताणाताणीनंतर चार महिन्यांनी ही भेट झाली. विशेष म्हणजे खासदार संजय राऊत यांनीच ही भेट घडवून आणली. त्यात विधानसभा निवडणुकीत समन्वयाने निर्णयावर एकमत झाल्याचे समजते.

या भेटीआधी चंद्रहार पाटील यांनीही ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करून विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकली. शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर आमदार विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) आणि विशाल पाटील यांनी ‘आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ’, असे सांगितले होते. तो योग काल जुळून आला.

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने विशाल पाटील हेही दिल्लीत असून, विश्‍वजित यांचाही सध्या दिल्ली दौरा सुरू आहे. हा योगायोग जुळून आला आणि ठाकरेंसोबत या दोन्ही नेत्यांची सविस्तर चर्चा झाली. त्याआधी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विश्‍वजित आणि विशाल यांचे स्वागत केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत. त्यात दोन काँग्रेसचे, तीन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार असून, दोन ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. या तीन जागांवर समन्वयातून निर्णयावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले. विशेषतः मिरज मतदारसंघावर विशेष चर्चा झाल्याचे समजते.

ठाकरेंचा आशीर्वाद घेतला : विशाल

खासदार विशाल पाटील म्हणाले, ‘‘उद्धवसाहेब दिल्लीत आल्याचे खासदार संजय राऊत यांनी आम्हाला कळवले. आम्ही त्यांना भेटायला आलो. आमचे वाद कधीच नव्हते, अस्तित्वाच्या लढाईत थोडा संघर्ष झाला होता. आमचे मनोमीलन नेहमीच आहे, ते पुढेही राहील. आमची आजची चर्चा राजकीय होतीच, शिवाय वसंतदादांच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित ताकदीने लढणार आहे.’’

भाजप हरल्याचा आनंद : ठाकरे

या भेटीबाबत पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विशाल पाटील, विश्‍वजित कदम, चंद्रहार पाटील ही तरुण मुले आहेत. त्यावेळी घडायला नको होत ते घडलं. पण, तिथे भाजप जिंकला नाही याचा आनंद आहे. चंद्रहार पाटील पडले त्याचं दुःख आहे, पण तिथे भाजप जिंकला नाही याचा आनंद आहे.’’

उद्धवसाहेबांशी खूप चांगली चर्चा झाली. राजकीय आणि कौटुंबिक विषयांवरही आम्ही बोललो. आगामी काळात एकमेकांना साथ देत पुढे जाऊ, असा आशीर्वाद त्यांनी दिला.

-आमदार विश्‍वजित कदम

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चुकीच्या पद्धतीने वागले. बंडखोरी करायला नको होती ती झाली. पुन्हा असे घडू नये, हे महत्त्‍वाचे आहे. उद्धवसाहेबांनी तसे स्पष्ट सांगितले आहे. जे घडून गेले, त्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकविचाराने सांगलीत लढावे आणि किमान सहा जागा जिंकाव्यात, असा प्रयत्न असेल.

-चंद्रहार पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT