निपाणी : येथील रामनगरात किल्ल्यांच्या प्रतिकृतीवर अखेरचा हात फिरवताना बालचमू. sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणीत अवतरतेय शिवसृष्टी! बालचमूचा उत्साह

सध्या प्रतिकृतीवर अखेरचा हात

राजेंद्र हजारे

निपाणी : निपाणीतील बालचमू ४ दिवसांपासून गड-किल्ले साकारण्यात गुंतले आहेत. अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या असून सध्या त्यावर अखेरचा हात फिरवला जात आहे. तर काही ठिकाणी विविध गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यात येत आहेत. दोन दिवसांत शहरासह उपनगरांतील किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार होणार आहेत. यंदा ३० पेक्षा अधिक ठिकाणी विविध प्रकारचे मोठे गड-किल्ले साकारण्यात आल्याने शहरात शिवसृष्टी अवतरल्याचे चित्र दिसत आहे.

शहराबरोबरच उपनगरातील गल्ली-बोळासह चौका-चौकात किल्ले बनविण्यात येत आहेत. आकर्षक सजावटीच्या माध्यमातून इतिहासाचा वारसा जोपासला जात आहे. कोवळ्या हातांनी दगड, माती व विटांपासून साकारलेल्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती पहावयास मिळत आहेत. यंदाही बालचमूंनी शिवनेरी, पुरंदर, पन्हाळा, रायगड, जंजिरा, प्रतापगड, राजगड, सामानगड, सिंहगड, तोरणा, वल्लभगड, सिंधुदुर्ग यासह अन्य ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. त्यावर राजदरबार, राणीमहाल, मंत्र्यांचे वाडे, तलाव, स्तंभ, धान्य कोठार, दारूगोळा कोठार, गुहा यासह कडेकपारी असे बारकावे पहावयास मिळत आहेत.

प्रगतीनगरातील बालचमूंनी आकर्षक सिंहगडाची प्रतिकृती साकारली आहे. महादेवगल्ली, बागवानगल्ली, चिमगावकरगल्ली, साखरवाडी, रामनगर, मेस्त्रीगल्ली, शिवाजीनगर, प्रगतीनगर, प्रतिभानगर, आंदोलननगर, शाहूनगर परिसरासह शहरात किल्ले बनविण्यात येत आहेत.

सिमेंटच्या जंगलात प्लास्टरचे गडकिल्ले

किल्ले तयार करण्यासाठी जागेसह दगड, मातीची आवश्यकता आहे. जागा नसल्याने अनेक पालक मुलांना बाजारातील प्लास्टरचे गड-किल्ले देत आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून सिमेंटच्या जंगलात प्लास्टरचे गड-किल्ले मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

'छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला समजण्यासाठी गड-किल्ले उभारले जात आहेत. त्यातून राष्ट्रप्रेमाचे धडे गिरविले जात असून किल्ले बनवताना बालकांसह युवकांचा उत्साह वाढत आहे.'

-सागर मिरजे, इतिहासप्रेमी, निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT