coaching 
पश्चिम महाराष्ट्र

धक्‍कादायक...''या'' शहरातील कोचिंग क्‍लासेसमधील विद्यार्थी असुरक्षित !

तात्या लांडगे
सोलापूर : गुजरातच्या सूरतमधील एका खासगी कोचिंग क्‍लासेसला आग लागून काही विद्यार्थ्यांचा त्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यभरातील कोचिंग क्‍लासेसची पडताळणी करण्यात आली. सोलापूर महापालिका अन्‌ अग्निशमनविभागातर्फे संयुक्‍त पडताळणी करून जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. तर, काही कोचिंग क्‍लासेसला सूचना करूनही शहरातील स्थिती "जैसे थे'च असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


आवश्‍य वाचाच...हे लक्षात असू द्या...1 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक


सूरत येथील कोचिंग क्‍लासला लागलेल्या आगीत 23 विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर शहरातील कोचिंग क्‍लासेच्या सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला. या पार्श्‍वभूमीवर मनपाच्या अग्निशमन विभागाने शहरातील खासगी कोचिंग क्‍लासेसची तपासणी केली. मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांनी यासंदर्भात शहरातील सर्व अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोचिंग क्‍लासेसची तपासणी केली. कोचिंग क्‍लासेसमधील अग्निसुरक्षेची काय व्यवस्था व सुधारण्याबाबत आढावा घेतला. शहरातील निवासी व व्यावसायिक संकुलातील सर्व कोचिंग क्‍लासेसची तपासणी केली. शहरातील अनेक व्यावसायिक संकुलात अवैधपणे कोचिंग क्‍लासेस सुरू असून काही कोचिंग क्‍लासेसला परवानगीच नसल्याचे पाहण्यात आले. सुरक्षेचे कुठलेही मानके निर्धारित न केल्याचे चित्र आहे. 150 चौरस मीटर क्षेत्रातील कोचिंग क्‍लासेसची तपासणी केली. निवासी भागात अत्यंत अरुंद व कमी जागेत कोचिंग क्‍लासेस सुरू असून तेथे महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवसुरक्षा उपाययोजना कायदा 2006चे पूर्णत: उल्लंघन होत असल्याचे श्री. आवटे यांनी सांगितले. धोकादायक ठरणाऱ्या सर्व कोचिंग क्‍लास आणि तेथील अवैध परवानगीची झोनल अधिकाऱ्यांसह नगररचना अधिकाऱ्यांना अहवाल दिला. मात्र, शहरात धोकादायक इमारतींची यादी देऊनही संबंधित विभागातर्फे कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली.


हेही वाचाच...धक्‍कादायक...या शहरात सर्वाधिक मद्यपी वाहनचालक


अहवालातील ठळक बाबी...
  • काही कोचिंग क्‍लासेसला कोणत्याही विभागाची परवानगीच नाही
  • निवासी भागात अत्यंत अरुंद व कमी जागेत कोचिंग क्‍लासेस
  • असुरक्षित व अवैध असणाऱ्या कोचिंग क्‍लासवर कारवाई करावी
  • खासगी कोचिंग क्‍लासेसमध्ये सुरक्षिततेची मानके निर्धारित केलेली नाहीत
  • महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसुरक्षा उपाययोजना कायदा 2006 चे पूर्णत: उल्लंघन
  • सरकारी यंत्रणांनी सर्व धोकादायक इमारतींतील वीजपुरवठा व पाणी जोडणी तोडावी

हेही वाचाच...हेही माहिती असू द्या...महापरीक्षा पोर्टलचे लेखापरीक्षण सुरु


अग्निशमनची एकाही क्‍लासकडे नाही परवाना
सूरत येथील आगीच्या घटनेनंतर राज्य सरकारने अग्निशमन विभागाला पत्र पाठवून शहरातील खासगी कोचिंग क्‍लासेसची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाहणी केली. मात्र, 67 क्‍लासेसपैकी 13 क्‍लासेसमध्ये सुरक्षिततेचे उपाय केल्याचे पाहण्यात आले. सूचना व लेखी पत्र देऊन बहुतांश क्‍लासेसकडून सुरक्षिततेचे उपाय केलेले नाहीत. आता त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याचे पत्र महापालिका, महावितरणला दिले जाणार आहे.
- केदार आवटे, मुख्य अग्निशमन अधिकारी, सोलापूर
-
शहराची स्थिती
एकूण कोचिंग क्‍लासेस
67
विद्यार्थी संख्या
4 ते 4,500
नियमांचे उल्लंघन (क्‍लासेस)
54
नियमानुसार सुरू असलेले क्‍लासेस
13

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT