Gondavale Maharaj Mandir 
पश्चिम महाराष्ट्र

Video श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा पालखी साेहळा निघाला श्रीरामाच्या भेटीला

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : श्रींच्या समाधी मंदिरात सनई चौघड्याची मधुर धून सुरू होती. मोठ्या मंगलमय वातावरणात सकाळी समाधी व पादुकांचे पूजन करण्यात आले. आरती झाली अन भाविकांनी श्रीरामाचा जयघोष करताच सजविलेल्या चांदीच्या पालखीत श्रींची प्रतिमा व पादुका विराजमान झाल्या. मोठ्या भक्तिभावाने श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची पालखी श्रीरामाच्या भेटीला निघाली. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

हेही वाचा - महाबळेश्‍वरच्या नक्षीदार काठ्यांची एक्झिट ? 

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०६ वा पुण्यतिथी महोत्सव गोंदवल्यातील समाधी मंदिरात कालपासून सुरू झाला आहे. यानिमित्ताने रिवाजाप्रमाणे श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. 

यंदा नव्याने बनविलेल्या चांदीच्या पालखीला पुष्पमालांनी सजविण्यात आली होती. भालदार,चोपदार देखील तयार होते. सकाळी नऊच्या सुमारास मंदिरात श्रींच्या समाधी व पादुकांचे विश्वस्तांच्या हस्ते विधिपूर्वक पूजन करण्यात आले.

त्यानंतर आरती होताच श्रीराम नामाच्या गजरात पादुका व प्रतिमा चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आल्या. यावेळी सारा मंदिर परिसर चैतन्यमय झाला होता.चोपदारांची श्री अनंत कोटी...ची आरोळी देताच पालखी मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली. पालखीसमोर अश्व आणि पताकाधारी भाविक तल्लीन होऊन नाचत होते.टाळकरी भजनात दंग होते आणि भाविक श्रीराम नामाचा जयघोष करत होते.





समाधी मंदिरातून निघालेली पालखी मिरवणूक हळूहळू पुढे सरकत निघाली होती. गावातील सर्वच मंदिरात पालखी सोहळा थांबून पुढे जात होता. ग्रामप्रदक्षिणेनंतर पुन्हा हा पालखी सोहळा समाधी मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवा दरम्यान रोज सकाळी ही पालखी मिरवणूक काढण्यात येते.

अवश्य वाचा - ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन...पुन्हा येईन...

दरम्यान श्रींच्या पालखीचे स्वागत सरपंच अश्विनी कट्टे यांनी केले.यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,ग्रामविकास अधिकारी अमोल पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

समाधी मंदिरात शालन आवळे,गौरी मुसळे,डॉ भालचंद्र जोशी,ध्रुव सचिन पटवर्धन कैलास खरे यांचे कीर्तन झाले. सावनी व रवींद्र घांगुर्डे,शर्वरी अरगडे,के गुरुनाथ,प्राजक्ता काकतकर,गिरीश संझगिरी यांचे गायन झाले.तसेच विविध भजनी मंडळांची भजने झाली.


 

गेल्या सुमारे ३१ वर्षांपासून मला पालखीची सेवा करण्याची संधी मिळत आहे. यातून मला मोठे समाधान मिळते.
 
बंडोपंत म्हासुर्णेकर- श्रींच्या पालखीचे सेवेकरी,म्हासुर्णे,ता.खटाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT