Corona vaccination for children between the ages of 15 and 18 has started from today  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : पहिल्यादिवशी ६० हजार मुलांना डोस

१५ ते १८ वयोगट; दिवसभरात ७०,०६४ जणांना कोविड लस

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यातील ६० हजार मुलांनी सोमवारी (ता.४) पहिल्यादिवशी कोविड प्रतिबंध लस घेतली. १५ ते १८ वयोगटासाठी शासनाकडून लसीकरण घोषित केले आहे. त्यानुसार यादिवशी ४१ हजार मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ होते. पण, सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झाल्याची नोंद असून, एकूण ६०,२५२ मुलांनी यादिवशी पहिली मात्रा घेतली.(Vaccination of children aged between 15 and 18)

बेळगाव तालुक्यात सर्वाधिक ९ हजार ७०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ठ होते. पण, येथे त्यापेक्षा अधिक लसीकरण झाल आहे. १५,४४२ मुलांना पहिली डोस देण्यात आली आहे. गोकाक तालुक्याचा क्रमांक त्यानंतर या तालुक्यामध्येही उद्दिष्ठापेक्षा अधिक लसीकरण पार पडले आहे. ८,७०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ठ होते. परंतु, ८,७०७ जणांचे लसीकरण पार पडले. सर्वात कमी रायबाग तालुक्यात लसीकरण झाले. ३,२०० उद्दिष्ठ होते. पण, केवळ १,३४४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण जाहीर करण्यात आल्यानंतर त्याला व्यापक जागृती देण्यात आली. यामुळे लसीकरणाला प्रतिसाद मिळाला आहे. बेळगावात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते कार्यक्रमाला चालना देण्यात आली.

अथणी तालुक्यासाठी २,५५० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. पैकी ७ हजार ४८२ जणांनी लस घेतली. बैलहोंगल १ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट होते. ३,११६ जणांचे लसीकऱण झाले. बेळगाव ९,७०० उद्दिष्ट होते. पैकी १५,४४२ जणांचे लसीकरण झाल्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. चिकोडी तालुक्यासाठी २ हजाराचे उद्दिष्ट होते. तेथे ६.६०० लसीकरण झाले आहे. गोकाक ८,७०० उद्दिष्ठ होते. ८,७०७ जणांचे लसीकरण झाले आहे. हुक्केरी ३,४०० उद्दिष्ठ होते. ४,९९६ जणांचे लसीकरण पार पडले. खानापूर २,८०० उद्दिष्ठ होते. या तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक लसीकरणाचे उद्दिष्ठ गाठणे शक्य झाले आहे. ५,०५९ जणांचे लसीकरण झाले आहे. रायबाग तालुक्यसाठी ३,२०० लसीकरणाचे उद्दिष्ठ होते. पण, येथे उद्दिष्ठ गाठणे शक्य झाले नाही. सरासरीपेक्षा कमी म्हणजे १,३३४ जणांचे लसीकरण झाले आहे. रामदूर्ग तालुक्यासाठीही ५,१३० जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ठ होते. पण, केवळ ३,५९२ लसीकरण झाल्याची नोंद आहे. सौदत्ती तालुक्यात ३,४०० लसीकरणाचे उद्दिष्ठ होते. या तालुक्यात ३,८२८ डोसची नोंद आहे.

दिवसभरात ७०,०६४ डोस

जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण करताना इतर वर्गालाही विविध केंद्रातून यादिवशी (ता.३) लसीकरण करण्यात आले आहे. त्यात १८ ते ४४ या वयोगटात ३,४९३ जणांनी पहिला डोस आणि २,८८१ जणांनी दुसरा डोस घेतल्याची नोंद आहे. ४५ ते ६० वयोगटात १४३ जणांनी पहिला आणि २,२६९ जणांनी दुसरा डोस घेतला. इतर १,०४३ जणांनी लाभ घेतला आहे. यादिवशी पहिली डोस ६३,९७३ व ६,०९१ जणांनी दुसरा डोस घेतला. दोन्ही मिळून ७०,०६४ जणांचे लसीकरण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT