Anganwadi School Action by Food and Drug Department  esakal
पश्चिम महाराष्ट्र

गर्भवती माता, बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप; 'या' अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार समोर

सकाळ डिजिटल टीम

हा प्रकार उघडकीस आल्यावर पोषण आहार नेलेल्या लाभार्थींशी संपर्क साधून आहार परत जमा करून घेण्यात आला.

पलूस : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत गर्भवती (Pregnant Women) माता आणि बालकांना दिल्या जात असलेल्या पोषण आहारात मृत साप (Snake) आढळला. येथील कृषिनगर अंगणवाडी क्र. ११६ मध्ये (Anganwadi) हा प्रकार उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासन विभागाने या अंगणवाडीतील आहाराचा साठा सील केला आहे. त्याचे नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

तसेच परिसरातील अंगणवाड्यांमधील पोषण आहार परत पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल आज महिला व बालकल्याण आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्षांच्या लहान बालकांना गेली अनेक वर्षे पोषण आहार पुरवला जातो.

एप्रिलपासून डाळ, तिखट, मीठ एकत्रित करून, तसेच गव्हाचे पीठ, साखर एकत्रित करून आहार ठेकेदाराकडून पुरवला जातो. संबंधित ठेकेदार कंपनीने एप्रिल व मेचा पोषण आहार पलूस येथील बीटला पोहोच केला. लाभार्थींना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले. कृषिनगर अंगणवाडी क्र. ११६ येथून लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी त्यांचा नातू शिरीषसाठी आहार घरी नेला. त्यांना पिशवीत चक्क लहान आकाराचा साप मृतावस्थेतील आढळला.

त्यांनी तत्काळ संबंधित अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधला. संबंधित सेविकांनी वरिष्ठ अधिकारी, तसेच अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोषण आहार नेलेल्या लाभार्थींशी संपर्क साधून आहार परत जमा करून घेण्यात आला. हा आहार न वाटण्याचा निर्णय घेतला.

भोसले म्हणाल्या, ‘‘मार्चपूर्वी पोषण आहार चांगल्या प्रतीचा, स्वच्छ, निवडक दिला जात होता. मार्चपासून आहारामध्ये डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्रित करून पिशवी बंद करून दिला जातो. विविध प्रकारचे पीठ, साखर एकत्रित करून त्याचीही पिशवी दिली जाते. तिखट, मीठ एकत्र केल्याने हा आहार लवकर खराब होतो. आहार पिशवी बंद झाल्यानंतर अंगणवाडीपर्यंत पोहोचेपर्यंत बराच कालावधी जातो. त्यामुळे हा आहार लवकर खराब होतो.’’

खराब झालेला आहार लाभार्थींपर्यंत पोहोचल्यास तो खाण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे राज्य शासनाने पूर्वीप्रमाणे आहार द्यावा. पलूस येथील कृषिनगर अंगणवाडीमध्ये सापडलेल्या सापाचे मृत पिल्लू पिशवीत कसे आले. त्याची सखोल चौकशी करावी. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पलूसमधील एका अंगणवाडीतून वाटप केलेल्या पोषण आहारातील पिशवीत मृत साप आढळल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने हा साठा सील केला आहे.

-संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल विकास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात

Sitaram Dalvi Passed Away: बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन! राज ठाकरेंनी केली पोस्ट

IND vs BAN 1st T2OI : संजू सॅमसन ओपनिंगला, मयांक किंवा हर्षित यांचे पदार्पण? पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI

SCROLL FOR NEXT