पंढरपूर-मिरज-पंढरपूर दरम्यान २०, २१, २५ व २७ नोव्हेंबर रोजी चार फेऱ्यांमध्ये गाड्या धावतील.
मिरज : मध्य रेल्वेच्या (Central Railway) सोलापूर विभागाकडून (Solapur Division) पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. मिरज-कुर्डुवाडी, मिरज-पंढरपूर आणि पंढरपूर-मिरजदरम्यान २० ते २७ नोव्हेंबरपर्यंत विशेष गाड्या धावतील.
पंढरपूर-मिरज-पंढरपूर दरम्यान २०, २१, २५ व २७ नोव्हेंबर रोजी चार फेऱ्यांमध्ये गाड्या धावतील. गाडी क्रमांक ०१४४३ पंढरपूर येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून मिरजेत दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. त्याच दिवशी मिरज-पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४४ मिरजेतून दुपारी १ वाजून १० वाजता सुटून पंढरपूर येथे सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल.
तर मिरज-पंढरपूर-मिरज ही विशेष गाडी २१ ते २५ नोव्हेंबर रोजी चार फेऱ्यांत धावणार आहे. मिरज-पंढरपूर गाडी क्रमांक (०१४४५) मिरजेतून सकाळी ८ वाजता सुटेल व पंढरपूर येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४६ पंढरपूर येथून सकाळी ११ वाजता सुटेल. मिरज येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. मिरज-कुर्डुवाडी-मिरज गाडी २१ ते २४ नोव्हेंबरपर्यंत चार फेऱ्यांत धावणार आहे.
मिरज-कुर्डुवाडी गाडी क्रमांक ०१४४७ मिरजेतून दुपारी ४ वाजता सुटून कुर्डुवाडी येथे रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. तर कुर्डुवाडी-मिरज ०१४४८ ही गाडी कुर्डुवाडी येथून रात्री ९ वाजता सुटून मिरज येथे रात्री १ वाजता पोहोचेल. आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जतरोड, मसोबा डोंगरगाव, जवळे, वासुद, सांगोला थांबे आहेत.
मिरज-पंढरपूर दरम्यान २० ते २७ पर्यंत सकाळी ८, दुपारी १ वाजून १० मिनिटांनी, दुपारी ४
पंढरपूर-मिरज दरम्यान २० ते २७ पर्यंत सकाळी ९ आणि ११
मिरज-कुर्डुवाडी दरम्यान २१ ते २४ पर्यंत दुपारी ४
कुर्डुवाडी-मिरज दरम्यान २१ ते २४ पर्यंत रात्री ९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.