Solapur zp 
पश्चिम महाराष्ट्र

अध्यक्ष निवडीनंतर जिल्हा परिषद परिसरात जल्लोष 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (ता. 31) दुपारी दोन वाजता पार पडली. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार अनिरुद्ध कांबळे हे विजयी झाले. तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उमेदवार दिलीप चव्हाण हे विजयी झाले. या विजयाची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 
सोलापूर जिल्हा परिषदेत कोणाचा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दोघांचे आभिनंदन केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात अध्यक्षपदाची निवड होताच भाजपतर्फे हलग्यांचा कडकडाट आणि फटाके फोडून विजयाचा जल्लोष व्यक्त केला. त्याचबरोबर गुलालाची देखल मुक्तपणे उधळण केली. मात्र, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना देखील विश्‍वास होता की आपलेच उमेदवार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतील. यामुळे त्यांनी सुद्धा जल्लोषाची तयारी केली होती. मात्र, काही जणांनी आपली मते भाजपच्या पारड्यात टाकल्याने त्यांना विजयाचा जल्लोष करण्याची संधी हुकली. गुलाल उधळण्याची संधी हुकल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य बळीराम साठे यांनी जिल्हा परिषदेतून लागलीच काढता पाय घेतला. मंगळवारी सकाळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भाजपच्या समविचारी नेत्यांची बैठक पार पडली. या वेळी समाधान आवताडे, विजयराज डोंगरे, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृह यशवंतनगर येथे महाविकास आघाडीची बैठक झाली.

या वेळी माजी आमदार रविकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील, शिवानंद पाटील, माजी आमदार दिलीप माने, करमाळा तालुक्‍यातील संतोष वारे, जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक माळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पाराव कोरे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. मात्र, या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी "सकाळ बोलताना सांगितले की या निवडणुकीत चमत्कार घडणार आहे. त्याप्रमाणे निवडणूक प्रक्रियेवेळी चमत्कार घडला. गेल्या काही दिवसांपासून शिवानंद पाटील हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत होते. मात्र, या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे, अमर पाटील हे या ठिकाणी उपस्थित नाहीत असे म्हणणे महाविकास आघाडींच्या नेत्यांकडून बोलले जात होते. ही दोन मते कोणाला मिळणार याकडे दोनही पक्षांचे लक्ष होते. मात्र, शैला गोडसे यांनी आपले मत महाविकास आघाडीच्या पारड्यात न घालता त्यांनी भाजपच्या पारड्यात टाकत व्हीपचा अवमान केल्याचा आरोप उमेश पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT