Jawalgaon Dam  sakal
सोलापूर

Jawalgaon Dam : जवळगाव धरण भरले १०० टक्के; १० हजार हेक्टर क्षेत्राला फायदा; १५ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

जवळगाव (ता. बार्शी) येथील नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प ३ ऑक्टोंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरला असून सुमारे तीस गावांना याचा फायदा होणार आहे. तर १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वैराग : जवळगाव (ता. बार्शी) येथील नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प ३ ऑक्टोंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरला असून सुमारे तीस गावांना याचा फायदा होणार आहे. तर १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच रब्बीसह इतर बागायती पिकांचे खात्रीशीर उत्पादन घेता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३४.९२ द.ल.घ.मी असून उपयुक्त पाणीसाठा २९.१९ द.ल.घ.मी इतका आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले.

त्यामुळे त्याचा सांडवा सुटला आहे. मागील वर्षी २०२३ मध्ये धरण केवळ ३० टक्केच भरले होते. तर २०२१ व २२ मध्ये ते शंभर टक्के भरले होते. जळगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे कालव्याच्या खाली सुमारे सहा हजार हेक्टर तर उचल पाण्यातून सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच पंधरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

धरणाच्या पाणलोट परिसरातील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केळी, ऊस, द्राक्षे यासारख्या बागायती पिकाबरोबर सोयाबीन, कांदा, तूर, मूग, उडीद, ज्वारी ही देखील पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चार तालुक्यांतील गावांना फायदा

जवळगाव धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे कालव्याद्वारे हत्तीज, हिंगणी, खुंटेवाडी, राळेरास, दहिटणे, सासुरे, कौठाळी, शेळगाव, देगाव, वाळूज या गावांना लाभ होतो तर प्रकल्पातून पाण्याच्या उपशाद्वारे अंबाबाईची वाडी, ज्योतिबाची वाडी, आंबेगाव, भालगाव, रुई, मिर्जनपूर, कासारी, भांडेगा, सारोळे, चिंचखोपण, खुटेवाडी या बार्शी तालुक्यातील तसेच तुळजापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर अशा चार तालुक्यातील गावांना लाभ होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT