18th national level lezim competition sakal
सोलापूर

Akaluj News : राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत ५८ संघांचा सहभाग

अकलूज येथे स्पर्धेला सुरवात; तीन दिवस चालणार स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

Akaluj News: संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळाच्या १८ व्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेत प्राथमिक गट, ग्रामीण गट, शहरी गट मुले, मुली व खुला गटातून ५८ संघांनी सहभाग घेतला आहे.

अकलूज येथील विजय चौकात संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने सलग तीन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचा शुभारंभ पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते मैदान पूजन करून झाले.

यावेळी अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, कार्याध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील, दीपक खराडे-पाटील, प्रदीप खरडे-पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे,

ज्येष्ठ खेळाडू लक्ष्मण आसबे, परीक्षक संतोष लोहार, हनुमंत भोसले, बबन चव्हाण, प्रभाकर चव्हाण, श्रीकांत राजमाने, मन्मथ पालखे, बाळासाहेब मगर, सहकारमहर्षी कारखाना, शिक्षण प्रसारक मंडळ व विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष व जयसिंह मोहिते-पाटील व मदनसिंह मोहिते-पाटील या बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे.

नाचण्यापेक्षा हलगीच्या ठेक्यावर लेझीम खेळा

यावेळी पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी अनेक सामाजिक मिरवणुकीत ’डीजे’चा वापर केला जातो अकलूज परिसरात ’डीजे’वर कडक कारवाई करण्यात येत असून त्यासाठी सर्वांनीच सहकार्य केले आहे.

या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेतून अनेक लेझीमपटू निर्माण होत आहेत. अकलूजमधून काढण्यात येणाऱ्या सर्वच मिरवणुकांतून डीजेवर बीभस्त नाचण्यापेक्षा हलगीच्या ठेक्यावर लेझीम खेळून नाचून आनंद व्यक्त करा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT