19 crore distributed to 5th and 8th scholarship holders diwali gift of school education at new rates sakal
सोलापूर

Solapur : पाचवी आठवी शिष्यवृत्तीधारकांना १९ कोटी वितरित; शालेय शिक्षणची नवीन दराने दिवाळी भेट

महाराष्ट्रात १९५४-५५ पासून शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील ३२ हजार ६६७ शिष्यवृत्तीधारकांना नवीन दराने १९ कोटी रुपयांचे वितरण दीपावलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याची माहिती योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

महाराष्ट्रात १९५४-५५ पासून शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहे. ही योजना इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत असे. आता ही शिष्यवृत्ती परीक्षा २०१५च्या शासन निर्णयानुसार इ.५ वी आणि इ.८वी इयत्तेत घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परिक्षा

परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीच्या स्पर्धा परिक्षेत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्याना मंजूर संचाच्या अधीन राहून या योजनेचा लाभ दिला जातो. ही शिष्यवृत्ती समाधान प्रगती व चांगल्या वर्तणूकीच्या आधारे पुढे चालू राहते.

तर योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर म्हणाले की, 'पुर्व उच्च प्राथमिक व पुर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती' ही शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहनात्मक देण्यात येते.

इयत्ता ५ वी साठी एकूण संच संख्या १६,६८३ एवढी असून इयत्ता ८ वी साठी १६,२५८ संच संख्या आहे. दरवर्षी इ .५ वीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे इ.६ वी, ७ वी, ८ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ५०,०४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. तर इ .८ वीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि इयत्ता ९ वी व इयत्ता १० वीमध्ये शिक्षण एकूण ३२,५१६ विद्यार्थ्यांना ही वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.

परीक्षेतून गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्तीधारक ठरल्यानंतर योजना शिक्षण संचालनालयाकडून शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती प्राप्त न होणे ही शिष्यवृत्ती वितरणातील प्रमुख अडचण आहे.

2021 पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त नसलेल्या शिष्यवृत्ती धारकांनी आपल्या बँक खात्याची माहिती तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचेकडे अचूक द्यावी. सदर माहिती www.eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर गटशिक्षणाधिकारी यांचेकडून अपडेट झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल. तर 2021 नंतर शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संबंधित शाळेने परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर शाळा लॉगीनद्वारे अचूकपणे भरणे आवश्यक आहे.

त्यासाठी शिष्यवृत्तीधारकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे संपर्क साधावा. शासन निर्णय 22 जुलै 2010 प्रमाणे 2022-23 पर्यंत विद्यार्थ्यांना संचनिहाय जुन्या विविध दराने वार्षिक (इयत्ता पाचवी कमाल एक हजार व इयत्ता आठवी कमाल दिड हजार रुपये) शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत होते.

चालू वर्षापासून सरसकट इयत्ता पाचवी पाच हजार इयत्ता आठवी 7500 अशी शिष्यवृत्तीच्या दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना 2023-24 पासून वाढीव दराने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे.

शासन निर्णयाप्रमाणे इयत्ता पाचवीसाठी प्रतिमहा 500 रुपयांप्रमाणे दहा महिन्यासाठी पाच हजार व इयत्ता आठवीसाठी प्रतिमहा 750 रुपये याप्रमाणे दहा महिन्यासाठी 7 हजार 500 प्रमाणे शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.

या शिष्यवृत्तीसाठी 2023-24 मध्ये एकूण चार लेखाशीर्षा अंतर्गत रक्कम चाळीस कोटी चाळीस लाख फक्त रुपये मंजूर आहे. 2023-24 मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणासाठी रक्कम 49 कोटी 95 लाख 50 हजार रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी नुकताच शासनस्तरावरुन एकोणीस कोटी 39.19 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे.

हा निधी सध्या इयत्ता ७ वी इ. ८ वी व इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आला आहे. नवीन दराने पहिल्यांदाच शिष्यवृत्तीचे वितरण होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती वितरणासाठी योजना अधिकारी मंगल वाव्हळ, अश्विनी साठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

"उर्वरित विद्यार्थ्यांना नवीन दराने शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक निधीची राज्य शासनाकडे मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती वितरण करण्यात येईल."

- डॉ. महेश पालकर शिक्षण संचालक (योजना) पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

Latest Maharashtra News Updates : १०० टक्के मतदान करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वोट फॉर रन मॅरेथॉनचं आयोजन

Winter Health : पौष्टिक आहारच वाढवेल प्रतिकारशक्ती

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

SCROLL FOR NEXT