Chokhoba Memorial Sakal
सोलापूर

चोखोबा स्मारकाचा 25 कोटीचा आराखडा तयार

बहुचर्चित प्रलंबित चोखोबा स्मारकासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रास्तावित स्मारक शासकीय जागेतील 1955 चौ. मी. जागेवर करण्याबाबत 25 कोटीचा प्रस्ताव तयार केला.

हुकूम मुलाणी ​

बहुचर्चित प्रलंबित चोखोबा स्मारकासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रास्तावित स्मारक शासकीय जागेतील 1955 चौ. मी. जागेवर करण्याबाबत 25 कोटीचा प्रस्ताव तयार केला.

मंगळवेढा - बहुचर्चित प्रलंबित चोखोबा स्मारकासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रास्तावित स्मारक शासकीय जागेतील 1955 चौ. मी. जागेवर करण्याबाबत 25 कोटीचा प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच शासनास सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी हरकती व सुचना 26 सप्टेबरचा कालावधी निश्‍चीत करण्यात आला

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयात नव्याने समाविष्ठ करावयाच्या कामासाठी 29 ऑगष्ट रोजी बैठक घेण्यात आली. त्यानुसार वारकरी संप्रादयाच्या प्रचार प्रसिध्दीच्या अनुसंघाने प्रास्तावित केलेल्या कामात चोखोबा स्मारकाचा आराखडा तयार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून स्मारकांची मागणी प्रलंबित होती स्व. आ. भारत भालके व आ. समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशानात प्रश्‍न उपस्थित केला.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी 24 ऑगष्ट 2018 रोजी शिखर समितीच्या बैठकीत स्मारकाच्या कामाची जागा निश्‍चीत करुन आराखडा करण्याचे आदेश दिले होते.

परंतु, स्मारकावरुन वेगवेगळी मते असताना 19 जानेवारी 2022 रोजी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार, मुख्याधिकारी मंगळवेढयातील पदाधिकाय्रासमवेत बैठक घेतली. त्यामध्ये स्मारक समाधी परिसरात व्हावे जेणेकरुन भविक पर्यटकास समाधी स्थळ व अन्य माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. शहरातील शासकीय कार्यालये बाहेर गेल्यामुळे शहरातील व्यवसायावर मोठा परिणाम झाला म्हणून, काही पोलीस वसाहतीजवळील जागा सुचविली होती. व्यापाय्राची उपजिविका कायम ठेवत पोलीस स्टेशन व गणेश मंडळाची जागा पुर्ववत ठेवत स्मारक करण्याबाबत जिल्हाधिकाय्रांनी मध्यस्थी केली होती. प्रत्यक्ष स्थळ 20 जानेवारी रोजी पाहणीसाठी मंगळवेढयात आले असताना आ. समाधान आवताडे, राहूल शहा, अजित जगताप, प्रविण खवतोडे, शशीकांत चव्हाण, प्रदीप खांडेकर, नंदकुमार पवार, अविनाश शिंदे, जयराज शेंबडे यांच्यासह अधिकाय्रांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत होऊन आ. आवताडे यांनी सर्वाना विश्‍वासात घेवून स्मारकाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आवाहन केले होते. शहरवासीयाच्या प्रतिक्रिया देखील जिल्हाधिकाय्रांनी जाणून घेतल्या होत्या.

प्रास्तावित समाधी स्थळ विकसीत करण्याकरिता तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत समाधीस्थळ,पुर्नविकास व सुशोभिकरण करणे,समाधीस्थळ परिसरातील यासाठी सि. सर्व्हे नं. 2292, 2293, 2294, 2295, 2282, 2283, 2278, 2276, 2285 ते 2291 या मिळकतीमधील 3172 चौ. मी. जागा उपलब्ध करण्यात आली त्यापैकी मंदीर व अंतर्गत रस्ता यासाठी 1217 चौ.मी जागा आवश्यक असल्याने 1955 चौ. मी. जागा स्मारकासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, व नगरपालिकेच्या जागेचा समावेश आहे प्रास्तावित स्मारकामध्ये पुर्नविकास व सुशोभिकरणात स्मारक उभारणी, सभामंडप, बहुउददेशीय सभागृह, अभ्यासकेद्र,भोजनकक्ष, भक्त निवास रस्ते वाहनतळ शाळा बांधणे रस्ते सुशोभिकरण इ. कामाचा यात समावेश आहे. यासाठी 25 कोटीचा निधीची आवश्यकता आहे.

स्मारकामुळे व्यापारी गाळे कायम राहून शाळाचे रुप बदलणार आहे. नव्याने रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र, पंढरपूरचा आराखडा तयार करताना हददवाढ भागाचा समावेश करण्यात आला. मंगळवेढयाच्या आराखडयाचा विचार करता हददवाढ भागाचा विचार करणे आवश्यक होते. हददवाढ भागातील अनेक नागरिक सोयीसुविधपासून वंचीत आहेत. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी, पालखी सोहळा प्रमुख, पत्रकार यांच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी 19 ते 26 सप्टेबर या कालावधीत उपलब्ध असून त्याबाबत काही सुचना व हरकती जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करण्याच्या सुचना नियोजन अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनास दिल्या.

प्रास्तावित कामे आणि रक्कम कोटीत

सभामंडप व बहुउददेशीय सभागृह 1.57,अभ्यासकेंद्र व भोजन कक्ष 1.37,भक्त निवास व व्यापारी संकुल 2.85, शाळा बांधणे 1.57, स्मारकाकडे जाणारे मार्ग 10.00, वाहनतळ 1.00, सुशोभिकरण 0.50 व जीएसटी 2.26 अशी 21.12 कोटीची रक्कम प्रास्तावित केली असून तीन वर्षातील भाडेवाढसहीत ते अंदाजपत्रक 24.92 कोटी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT