300 cr to solapur to dharashiv railway route state govt unable to pay fund esakal
सोलापूर

Solapur Dharashiv Railway Route : राज्य सरकारमुळे रखडला सोलापूर ते धाराशिव रेल्वे मार्ग

सोलापूर-धाराशिवबाबत मध्य रेल्वे महाप्रबंधक यादव यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : सोलापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेने तीनशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या पन्नास टक्के भागीदारीतून हा प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारचे आवश्‍यक असलेले सहकार्य मिळत नाही.

त्यामुळे हा प्रकल्प रखडला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राम करण यादव यांनी दिली. महाप्रबंधक यादव यांनी आज कुर्डूवाडी ते लातूर दरम्यानच्या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सोलापुरातील रेल्वे मंडळ प्रबंधक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, मंडळ प्रबंधक निरजकुमार दोहरे आदी उपस्थित होते. महाप्रबंधक यादव म्हणाले, सोलापूर ते धाराशिव हा रेल्वे मार्ग दोन टप्प्यात साकारला जात आहे.

सोलापूर ते तुळजापूर व तुळजापूर ते धाराशिव असा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन आवश्‍यक आहे. भूसंपादनाची प्रक्रिया जलद होत नाही. आम्ही या कामासाठी निविदा काढली आहे. भूसंपादन पूर्ण होईपर्यंत या कामाला गती मिळणार नाही.

सोलापूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसला स्लिपर कोच जोडण्यात आला आहे. चार तासांच्या प्रवासासाठी स्लिपर कोचऐवजी जनरल डबा जोडावा. स्लिपर कोचमुळे प्रवाशांना जास्तीचे प्रवास भाडे मोजावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

या गाडीला जनरल डबा वाढविण्यासाठी महाप्रबंधक यादव यांनी सकारात्मकता दर्शविली. खासदार महास्वामी यांनीही रेल्वे संदर्भातील विविध प्रश्‍न उपस्थित केले. सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे व रेल्वे स्थानकांच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी महाप्रबंधक यादव यांना दिले.

कुर्डूवाडीच्या प्रश्‍नावर मौन

कुर्डूवाडी येथील कोच बनविण्याचा कारखाना इतर ठिकाणी हलविण्यात आला आहे. कुर्डूवाडी येथील रेल्वे पोलिस बलाचे प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे हलविण्यात आले आहे. कुर्डूवाडीतील सेंटर फक्त बाहेरच जाणार का?

कुर्डूवाडी नवीन काही प्रकल्प येईल का? असा प्रश्‍न महाप्रबंधक यादव यांना विचारला असता ते निरुत्तर झाले. मंडळ प्रबंधक दोहरे यांनी तोडके-मोडके उत्तर देऊन रेल्वेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

हुबळी-हैदराबाद सोलापुरात आणण्यास अडचण

हुबळी ते हैदराबाद धावणारी रेल्वे होटगी स्टेशनवरून जाते. होटगीला जाऊन या गाडीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रिक्षासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर आणून येथून सोडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सोलापूर रेल्वे स्थानकावर या गाडीसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही. बाकीच्या काही गाड्या रद्द कराव्या लागतील अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सोलापूरकरांना आणखी काही दिवस हुबळी-हैदराबाद गाडीसाठी होटगी स्टेशनलाच जावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT