Corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 330 पॉझिटिव्ह रुग्ण; आठ जणांचा मृत्यू; बाधितांची संख्या 7390

संतोष सिरसट

सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 330 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या अहवालानुसार एकूण बाधितांची संख्या सात हजार 390 इतकी झाली आहे. 

आज यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षीय पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 53 वर्षे पुरुष, कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील 70 वर्षीय पुरुष, शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथील 65 वर्षांची महिला, कुर्डू (ता. माढा) येथील 70 वर्षांची महिला, पापनस (ता. माढा) येथील 35 वर्षीय पुरुष, बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी येथील 52 वर्षीय पुरुष, श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील 80 वर्षांची महिला यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 205 इतकी झाली आहे. अद्यापही दोन हजार 905 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर चार हजार 280 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्यापही 152 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. 

या ठिकाणी आढळले रुग्ण 
आज अरळी (ता. अक्कलकोट), दुधनी, गुड्डेवाडी, समर्थनगर, करजगी, खासबाग, कुरनूर, नागणसूर, मानेगाव, करमाळा तालुक्‍यातील अर्जुननगर, भवानी नाका, भीमनगर, देवळाली, कुंभेज, माढा तालुक्‍यातील अरण, बेंबळे, भोसले, कुर्डू, कुर्डुवाडी, मोडनिंब, परिते, पिंपळनेर, रणदिवेवाडी, श्रीरामनगर, मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव, परळी, मरवडे, पाटखळ, सलगर, तळसंगी, तामदर्डी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हगलूर, इंडियन ऑइल डेपो, पाकणी, पडसाळी, वडाळा, सांगोला तालुक्‍यातील बलवडी, जवळा, कारंडेवाडी, नाझरे, राजुरी, सणगर गल्ली, यलमार, मंगेवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी, दर्गनहल्ली, टाकळी, पंढरपूर तालुक्‍यातील आढीव, बडवे गल्ली, भक्तिमार्ग, भोसले चौक, दाळे गल्ली, धर्मशाळा, उपजिल्हा रुग्णालय, एकनाथनगर, गादेगाव, गुरसाळे, इसबावी, जुने पेठ, कवठाळी, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, माहेश्वरी धर्मशाळा, नवी पेठ, परदेशीनगर, पोलिसलाइन, प्रदक्षिणा मार्ग, रोपळे, संत पेठ, सरकोली, सावरकर मैदान, शासकीय वसाहत, सिद्धेवाडी, सुस्ते, तानाजी चौक, तुंगत, उत्पात गल्ली, विवेक वर्धिनी विद्यालयजवळ, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव, कोर्टासमोर, माळशिरस, कोंडारपट्टा, महाळुंग, माळेवाडी, माळीनगर, मांडवे, नातेपुते, पिलीव, संगम, संग्रामनगर, शेंडेचिंच, श्रीपूर, यशवंतनगर, मोहोळ तालुक्‍यातील गोटेवाडी, हराळवाडी, कामती बुद्रूक, कुंभार गल्ली, कुरूल, समर्थनगर, बार्शी तालुक्‍यातील 422 झोपडपट्टी, आगळगाव, ऐनापूर मारुती रोड, अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, भालगाव, भवानी पेठ, भीमनगर प्लॉट, भवानी पेठ, बुरूड गल्ली, दडशिंगे, दत्तनगर, गाडेगाव रोड, घारी, जैन मंदिराजवळ, बार्शी-जामगाव रोड, कसबा पेठ, लातूर रोड, लोकमान्यता, मंगळवार पेठ, महादेवी नगर प्लॉट, जैन मंदिराजवळ, मुरलीधर मंदिराजवळ, सह्याद्री खानावळ, सात्विक सौंदर्य, शिवशक्ती मैदान, श्रीपत पिंपरी, धनगर गल्ली, सुलाखे हायस्कूल रोड, सुश्रुत हॉस्पिटल क्वार्टर, ताडसौंदणे, तेल गिरणी चौक, तुळजापूर रोड, उंबरगे, उपळे दुमाला, वैराग प्लॉट, झाडबुके मैदान या ठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT