मंगळवेढा तालुक्यातील लवंगी गावामध्ये मुक्ताई गतिमंद मुलांचे बालगृह ही संस्था आहे. या संस्थेत दहा ते तीस वयोगटातील 62 गतिमंद मुले आहेत.
सलगर बुद्रूक (सोलापूर) : कोरोनाचा (Covid-19) प्रसार वाढत असून, लवंगी (ता. मंगळवेढा) येथील मुक्ताई गतिमंद बालगृहातील 62 पैकी 41 मुले कोरोना पॉझिटिव्ह (Corona) निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (41 children from the mentally retarded nursery in Lavangi tested positive for corona)
याबाबत सविस्तर वृत्त असे, की मंगळवेढा तालुक्यातील लवंगी गावामध्ये मुक्ताई गतिमंद मुलांचे बालगृह ही संस्था आहे. या संस्थेत दहा ते तीस वयोगटातील 62 गतिमंद मुले आहेत. गुरुवारी (ता. 27) बालगृहातील काही मुलांना तापाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक शिवाजी जाधव यांनी जवळच असलेल्या सलगर बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्राला लेखी स्वरूपात कळवले. त्यानंतर सलगर बुद्रूक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करण्यासाठी आपले पथक बालगृहात पाठवले. बालगृहातील सर्व मुलांची तपासणी केल्यानंतर त्यातील 41 मुले ही पॉझिटिव्ह निघाली. दरम्यान, संस्थापक जाधव यांनी पुढील पावले तत्काळ उचलली व प्रांत अधिकाऱ्यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कालच सर्व मुलांना सोलापूर शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
गुरुवारी अचानक काही मुलांना तापाची लक्षणे दिसताच सलगर बुद्रूक येथील आरोग्य केंद्रामार्फत सर्व मुलांची कोव्हिड टेस्ट केली असता एकूण 62 पैकी 41 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. तत्काळ प्रशासनाच्या मदतीने सोलापूर शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. बाकी राहिलेल्या मुलांवर विशेष काळजी घेत आहोत.
- शिवाजी जाधव, संस्थापक, मुक्ताई गतिमंद मुलांचे बालगृह, लवंगी
मुक्ताई गतिमंद मुलांच्या बालगृहातील 41 मुले कोरोना पॉझिटिव्ह आले होते. काल सर्वांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. राहिलेल्या मुलांची चाचणी केली आहे. प्रशालेत निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज भेट दिली असून त्यांनी विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे.
- उदयसिंह भोसले, प्रांताधिकारी, मंगळवेढा- लवंगी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.