5 TMC of water in ujani dam Sakal
सोलापूर

Solapur News : सात दिवसांत उजनीत साडेपाच टीएमसी पाणी; दौंडवरून धरणात ३४०० क्युसेकचा विसर्ग; धरण उणे ५० टक्के

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : यंदाच्या उन्हाळ्यात सर्वात निच्चांकी पातळीवर (उणे ६० टक्के) पोचलेल्या उजनी धरणातील पातळी आता सुधारू लागली आहे. मागील सात दिवसांत धरणात साडेपाच टीएमसी जमा झाले असून सध्या धरण उणे ५० टक्क्यांवर आले आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढलेली असतानाच उजनी धरणही मायनस ६० टक्के झाल्याने कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्याचा पर्यायही नाहीसा झाला होता. पावसाळा सुरू होताच ८ ते १४ जून दरम्यान धरण परिसरात चांगला पाऊस झाला.

त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात जवळपास ३७ टीएमसी पाणी आहे, जो ७ जूनला ३१.५३ टीएमसीपर्यंतच होता. धरणात सध्या दौंडवरून तीन हजार ४०० क्युसेकचा विसर्ग येत आहे.

धरणाची पाणीपातळी प्लसमध्ये येण्यासाठी धरण परिसरात सलग काही दिवस मुसळधार पावसाची गरज आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात म्हणजेच भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यास आणि पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उजनीत येणारा विसर्ग वाढेल.

त्यानंतर धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढेल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, अद्याप भीमा खोऱ्यातील धरणांतील पाणीसाठा तळाशीच आहे. त्यामुळे धरणाला प्लसमध्ये येण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT