SMC 
सोलापूर

महालिकेतील 563 लिपिकांची होणार होणार "या' दिवशी परीक्षा; टायपिंग अन्‌ संगणक उत्तीर्णची अट 

तात्या लांडगे

सोलापूर : संगणक टायपिंग आणि संगणक येत असल्याचे प्रमाणपत्र जोडून 563 कर्मचाऱ्यांनी लिपिक पदावर पदोन्नती मिळविली. मात्र, आता त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. सोमवारी (ता. 17) या लिपिकांना संगणक आणि टायपिंग अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागणार असून, त्यात अनुत्तीर्ण होणाऱ्यांना मूळ पदावर परत जावे लागणार आहे. 

शिपाई पदावर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी पदाधिकारी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून पदोन्नती मिळविल्याचा संशय आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी कर्मचारी आणि प्रशासनात समन्वय, शिस्त लावण्याच्या हेतूने प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून मागविली आहे. त्यामध्ये अनुकंपाअंतर्गत भरती झालेले कर्मचारी, कामावर सातत्याने गैरहजर राहणारे कर्मचारी, वारंवार नोटीस देऊनही वर्तन न सुधारलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी पहिल्या टप्प्यात पदोन्नतीवर लिपीक झालेल्यांचा विषय हाती घेतला आहे. काम जमत नसतानाही या कर्मचाऱ्यांना भरमसाठ वेतन देण्यात आलेच कसे, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

परीक्षा रद्दसाठी अनेकांचा प्रयत्न 
महापालिकेतील कारभार नवख्यांना अचंबित करणारा असून अनेकजण महापालिकेतील कामकाज पाहून वैतागले आहेत. याचा पहिला नमूना म्हणजे टायपिंग तथा संगणक हाताळता येत नसतानाही कर्मचाऱ्यांना लिपीक पदावर मिळालेली पदोन्नती हा आहे. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी यामध्ये लक्ष घातल्यानंतर अनेकांना मूळपदावर जावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांनी घेतलेला हा निर्णय रद्द करावा, यासाठी राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र, दबावाला न जुमानता आयुक्‍त परीक्षा घेण्यावर ठाम असून सोमवारी या लिपीकांची परीक्षा होणार आहे. दरम्यान, पदोन्नती मिळाल्यानंतर आम्हाला त्या पदावर काम करण्याची संधीच प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे आता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची सवलत द्यावी, अशीही मागणी कामगार करु लागले आहेत. आयुक्‍तांनीही त्यास होकार दिला, मात्र आदेशात तसे नमूद केलेले नाही. त्यामुळे आता परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

दिव्यांग लिपिकांना सवलत 
महापालिकेने पदोन्नती मिळालेल्या लिपिकांचे तीन गट केले आहेत. त्यामध्ये 50 वर्षांवरील लिपिक, 50 वर्षांच्या आतील लिपिक आणि दिव्यांग लिपिक यांचा समावेश आहे. त्यातून दिव्यांगाना वगळण्यात आले असून आता 50 वर्षांवरील व 50 वर्षांखालील लिपिकांची परीक्षा होणार आहे. 50 वर्षांवरील लिपिकांना फक्‍त टायपिंगची परीक्षा द्यावी लागणार आहे. तर 50 वर्षांखालील लिपिकांना टायपिंग आणि संगणक या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागणार आहेत. 

पदोन्नतीवरील लिपिकांची स्थिती 

  • एकूण लिपिक : 563 
  • 50 वर्षांवरील लिपिक : 330 
  • 50 वर्षांखालील लिपिक : 218 
  • दिव्यांग लिपिक : 25 
  • वेतनावरील दरमहा खर्च : 3.80 कोटी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT