election news  sakal
सोलापूर

सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी हवीत ६५० मते! शुक्रवारी मतदान अन्‌ निकाल

बार असोसिएशनसाठी शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मतदान पार पडणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : बार असोसिएशनसाठी शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मतदान पार पडणार आहे. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ८) खजिनदार पदाचे उमदेवार ॲड. संतोष बाराचारे यांनी अर्ज मागे घेतला. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक थेट होत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्यासाठी किमान साडेसहाशे मते घ्यावी लागणार आहेत.

वकिलांच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी ॲड. राजेंद्र फताटे यांचे विधी विकास पॅनल आणि ॲड. सुरेश गायकवाड यांचे विधीसेवा पॅनल मैदानात उतरले आहे. बार असोसिएशनचे एकूण एक हजार ४६७ मतदार आहेत. दोन्ही पॅनलप्रमुखांनी उमेदवारांना सोबत घेऊन वकिलांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. पॅनल टू पॅनल मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. सद्यस्थितीत सहसचिवपदासाठी विधीसेवा पॅनलच्या उमेदवार ॲड. अनिता रणशृंगारे यांचे पारडे जड असल्याची चर्चा महिला वकिलांमध्ये आहे. दुसरीकडे दोन्ही पॅनलने विजयाचे दावे केले आहेत. ॲड. फताटे हे पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पण, ॲड. गायकवाड यांनी मागच्या निवडणुकीतील चुका दुरूस्त करून प्रचार सुरु केला आहे. सचिव, सहसचिव व खजिनदार पदासाठी उमेदवार जास्त असल्याने विजयासाठी किमान ४०० ते ४५० मते घ्यावी लागणार आहेत. काहींनी स्वत:चा विजय निश्चित करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केल्याचीही चर्चा आहे. प्रचारासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. शुक्रवारी (ता. ११) बारचा नवा अध्यक्ष कोण याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विधी विकास पॅनलचे उमेदवार

  • अध्यक्ष : ॲड. राजेंद्र फताटे

  • उपाध्यक्ष : ॲड. आसिम बांगी

  • सचिव : ॲड. करण भोसले

  • सहसचिव : ॲड. शाहीन शेख

  • खजिनदार : ॲड. अविनाश काळे

विधीसेवा पॅनलचे उमेदवार

  • अध्यक्ष : ॲड. सुरेश गायकवाड

  • उपाध्यक्ष : ॲड. सिद्धाराम म्हेत्रे

  • सचिव : ॲड. अभिजित देशमुख

  • सहसचिव : ॲड. अनिता रणशृंगारे

  • खजिनदार : ॲड. अब्दुल शेख

शेवटपर्यंत मनधरणी, पण शेवटी अर्ज ठेवलाच

सचिवपदासाठी ॲड. लक्ष्मण पाटील यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनलकडून झाला. पण, त्यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. सहसचिव पदासाठी ॲड. शाहिन शेख, ॲड. सुवर्णा शिंदे तर खजिनदार पदासाठी ॲड. अविनाश काळे, ॲड. विनयकुमार कटारे व ॲड. एच. अगनुर यांनी उमेदवारी कायम ठेवली. स्वतंत्रपणे उभारलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला दोन्ही पॅनलप्रमुखांना यश मिळाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT