Crime sakal
सोलापूर

अलिबागच्या वकिलाने महिलेवरील अत्याचाराचा बनविला व्हिडिओ अन्‌...

अलिबागच्या वकिलाने महिलेवरील अत्याचाराचा बनविला व्हिडिओ अन्‌...

तात्या लांडगे

पहिला विवाह झालेला असतानाही त्या पत्नीला घटस्फोट न देता ऍड. महेश मोहिते (रा. रायवाडी, ता. अलिबाग, जि. रायगड) याने ओळखीच्या महिलेसोबत मंदिरात विवाह केला.

सोलापूर : पहिला विवाह झालेला असतानाही त्या पत्नीला घटस्फोट न देता ऍड. महेश हरीशचंद्र मोहिते (Mahesh Mohite) (रा. रायवाडी, ता. अलिबाग, जि. रायगड) (Raigad) याने ओळखीच्या महिलेसोबत मंदिरात विवाह केला. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी त्या महिलेने जोडभावी पेठ पोलिसांत (Jodbhavi Peth Police Station) फिर्याद दिली असून ऍड. मोहितेविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. जिल्ह्याबाहेरील संशयित आरोपी असल्याने त्याच्या शोधासाठी जोडभावी पेठ पोलिसांनी उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर (Dr. Vaishali Kadukar) यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे.

पीडित महिलेचा 2011 मध्ये पहिला विवाह झाला होता. परंतु, तिचा पती मद्यपी होता आणि त्यांच्यात सारखे वाद व्हायचे. दरम्यान, एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ऍड. मोहिते व त्या महिलेची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे वाढले, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे सांगून ऍड. मोहिते याने तिच्यासोबत विवाह केला. 6 ऑक्‍टोबर 2015 रोजी मुंबईतील एका मंदिरात विवाह झाल्यानंतर पनवेल या ठिकाणी भाड्याने रूम घेऊन त्या ठिकाणी दोघेही काही दिवस राहिले.

दरम्यान, ऍड. मोहितेच्या नातेवाइकांकडून पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसल्याचे त्या महिलेला समजले. दोघांमध्ये वाद वाढले. 2018 मध्ये त्यांना एक मुलगी झाली आणि त्यानंतर ऍड. मोहिते त्या महिलेला टाळू लागला. त्यानंतर पनवेल येथील खांदेश्‍वर पोलिसांत त्या महिलेने धाव घेतली. काहीतरी सांगून त्याने फिर्याद मागे घेण्यास भाग पाडले. 14 एप्रिल 2021 रोजी तो सोलापुरातील त्या महिलेच्या घरी आला. त्या ठिकाणी त्याने महिलेवर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ तयार केला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने जोडभावी पेठ पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बचत गट भरायला गेलेली मुलगी न सांगताच पसार

एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरातील सुनील नगरातील 22 वर्षीय मुलगी बचत गटातील पैसे भरायला जाते म्हणून घरातून निघून गेली. 24 नोव्हेंबरला घरातून निघून गेलेली मुलगी घरी परत आली नसल्याने तिच्या पालकांनी नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले आणि मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

मद्यपानावरून हॉटेल मॅनेजरला मारहाण

हॉटेल बंद करण्याची वेळ झाली असे सांगत असताना सहाजणांनी काउंटरमध्ये शिरून हॉटेल मॅनेजरला मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. 25) रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेल मयूरवन येथे घडली. हॉटेल मॅनेजर गणेश आतकरे (रा. देगाव, ता. मोहोळ) यांच्या फिर्यादीवरुन महादेव राम भंडारे, महेश श्रीमंत कंपल्ली (दोघेही रा. मोदीखाना) यांच्यासह चारजणांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, एका व्यक्‍तीने खिशातील चाकूसारखी वस्तू काढून दारू पिण्यास न दिल्यास मारून टाकेन, अशी दमदाटी केली. त्याला प्रतिकार केल्यानंतर त्या सर्वांनी हॉटेलमधील टेबल, बॉटल्स्‌, फ्रीजसह अन्य साहित्यांची तोडफोड केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलिस नाईक सोनार हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT