MP & MLA Cnava
सोलापूर

मराठा आक्रोश मोर्चा! दोन खासदार, सात आमदार अन्‌ महापौरांविरुद्ध गुन्हा

मराठा आक्रोश मोर्चा ! दोन खासदार, सात आमदार अन्‌ महापौरांविरुद्ध गुन्हा दाखल

तात्या लांडगे

मराठा आक्रोश मोर्चासाठी शहर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही, संयोजकांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीररीत्या एकत्र येऊन जमाव जमवून पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत घोषणाबाजी केली.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर मराठा आक्रोश मोर्चाला (Maratha Akrosh Morcha) परवानगी नाकारूनही रविवारी सोलापुरात मोर्चा निघाला. त्यामुळे पोलिसांनी मोर्चात सहभागी झालेले दोन खासदार, सात आमदार, महापौर, माजी मंत्री यांच्यासह संयोजक माजी आमदार नरेंद्र पाटील (Former MLA Narendra Patil) तसेच सोलापूर महापालिकेतील काही नगरसेवक व संयोजकांवरही फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (A case was registered against two MPs and seven MLAs in the Maratha Akrosh Morcha case)

सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार शहरात सामाजिक सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, मराठा आक्रोश मोर्चासाठी शहर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही, संयोजकांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीररीत्या एकत्र येऊन जमाव जमवून पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत घोषणाबाजी केली. कोरोना संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एकमेकांमध्ये सामाजिक अंतर न ठेवता आदेशांचे उल्लंघन केले. इतरांच्या जीवितास धोका होईल, असे हयगयीचे कृत्य केले. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस फिर्यादीत नमूद आहे.

"या' प्रमुखांवर दाखल झाला गुन्हा

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजित नाईक-निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, राम सातपुते तसेच सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, माजी आमदार नरेंद्र पाटील, किरण पवार, राम जाधव, नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश भोगडे, अमर पुदाले, विनायक विटकर, जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी नगरसेवक अनंत जाधव, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सतीश ऊर्फ बिज्जू प्रधाने, राजू सुपाते, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, नगरसेवक संतोष भोसले, सोमनाथ राऊत, प्रसाद लोंढे, निखिल भोसले, विजयकुमार डोंगरे, मोहन डोंगरे, ललित धावणे, मतीन बागवान, प्रताप पाटील, मनोज शिंदे, विजयकुमार साठे, राजकुमार पाटील, सौदागर क्षिरसागर, विष्णू बरगंडे, सुरेश आंबुरे, अमीर मुलानी, पांडुरंग गायकवाड, मकरंद माने, अक्षय सूर्यवंशी, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे व आणखी काही जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

मोर्चाचे शूटिंग पाहून गुन्हे दाखल

मराठा आक्रोश मोर्चावेळी पोलिसांनी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शूटिंग काढून घेतले आहे. फौजदार चावडी पोलिसांनी 46 जणांची नावे निष्पन्न करून त्यांच्यासह इतरांवरही गुन्हा दाखल केला आहे. आता आणखी शूटिंग पाहून त्यातील प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक मंडले हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT