कामती पोलिसांनी त्या दूधवाल्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
कोरवली (सोलापूर): दारुची तस्करी करणाऱ्यांकडून वेगवेळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. दुधाच्या कॅन देशी विदेशीची दारु वाहतूक करण्याची घटना कामती पोलिसांनी उघडकीस आणली आहे. सोलापूर- मंगळवेढा महामार्गावर वाघोली (ता. मोहोळ) येथील दुग्ध व्यवसायिकास दुधाच्या कॅनमधून देशी-विदेशी दारूची तस्करी करताना रंगेहाथ पकडले.
कामती पोलिसांनी त्या दूधवाल्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दत्तात्रय विश्वनाथ पाटील (वय 36 ) रा. वाघोली (ता. मोहोळ) असे त्या संशयिताचे नाव आहे. तो वाघोली येथील शेतकऱ्याकडून दूध घेऊन दररोज सोलापूरला जाऊन दूध विक्रीचा व्यवसाय करीत होता. पोलिस सूत्रांनुसार दत्तात्रय पाटील हा (एम. एच.13 डि.के 2199) या मोटार सायकलला दुधाचे कॅन अडकवून देशी व विदेशी दारू बेकायदेशीररित्या आणि विनापरवाना विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती हवलदार जीवराज कासवीद यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना ती संशयित गाडी थांबवून चौकशी केली. दुधाचे कॅन उघडून पाहिले असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूच्या एकूण 55 बाटल्या आढळून आल्या. याबाबत पोलीस श्रीकांत देवकते यांनी फिर्याद दाखल केली आहे. दारू, कॅन, मोटरसायकल असा एकूण चोवीस हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली जीवराज कासवीद अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.