'उजनी'तून विमानसेवेचे ठिकाण निश्‍चित ! इंदापूरजवळील कालठणची निवड Canva
सोलापूर

'उजनी'तून विमानसेवेचे ठिकाण निश्‍चित ! इंदापूरजवळील कालठणची निवड

'उजनी'तून विमानसेवेचे ठिकाण निश्‍चित ! इंदापूरजवळील कालठणची निवड

तात्या लांडगे

पंढरपूर, इंदापूर, पुण्याचा प्रवास स्वस्तात आणि जलद व्हावा म्हणून उजनी धरणातून विमानसेवा (sea airplane service) सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सोलापूर : पंढरपूर (Pandharpur), इंदापूर (Indapur), पुण्याचा (Pune) प्रवास स्वस्तात आणि जलद व्हावा म्हणून उजनी धरणातून (Ujani Dam) विमानसेवा (sea airplane service) सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) माध्यमातून धरणातील तीन ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून, त्यातील दोन ठिकाणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरणार आहेत. त्यामुळे इंदापूरजवळील कालठण (Kalthan) हे ठिकाण निश्‍चित करण्यात आले असून, तसा अहवाल नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाला (Ministry of Civil Aviation) पाठविण्यात आला आहे.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मागणीनुसार उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर धरणाच्या दरवाजाजवळ एक ठिकाण विमानसेवेसाठी उत्तम आहे. मात्र, धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणावरून धरणाजवळ परवानगी देता येणार नाही, असे उजनी जलाशय व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. तर कुंभारगाव परिसरातील ठिकाणी परदेशातून विविध पक्षी येतात आणि त्या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणालाही मान्यता देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कालठणची जागा निश्‍चित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी टेक्‍निकल एक्‍स्पर्ट यांनी त्या ठिकाणांची पाहणी केली आहे. आता नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून त्यांच्या अहवालाचा अभ्यास करून त्यांच्याकडून पुन्हा स्वतंत्रपणे पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, त्याला उजनी जलाशय (जलसंपदा) आणि पर्यावरण विभाग व एअर ट्राफिक कंट्रोल विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.

उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी तांत्रिक तज्ज्ञांकडून पाहणी झाली. त्यांनी तीन ठिकाणांची पाहणी केली असून त्यापैकी इंदापूरजवळील कालठण हे ठिकाण सोयीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी आमच्याकडून ना-हकरत प्रमाणपत्र दिले जाईल.

- रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी जलाशय व्यवस्थापन

पंढरपूरला सहजपणे जाता येणार

उजनी धरणातून विमानसेवा सुरू केल्यानंतर नगर, पुणे, सोलापूर, लातूर यासह विविध जिल्ह्यांतील नागरिकांना विनाविलंब सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांचीही सोय होणार असून त्यांना कमी वेळेत त्या ठिकाणी पोचता येणार आहे. पर्यटनवाढीसही मदत होणार आहे. दरम्यान, कालठण परिसरात वर्षभर पाणी (45 ते 50 मीटर खोल) असते. त्या ठिकाणी उभा व आडवा आठ किलोमीटरचा मार्ग विमानसेवेसाठी आहे. या पार्श्‍वभूमीवर त्या परिसरात विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT