शहरातील सलीम शेख (कुमठे) याने मारहाणीचा जुना व्हिडिओ व्हायरला केला. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली.
सोलापूर : त्रिपुरातील (Tripura) घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन समाजात तथा धर्मांत तेढ निर्माण होईल, असा कोणताही आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) टाकू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त हरीश बैजल (Commissioner of Police Harish Baijal) यांनी केले आहे. कठोर कारवाईचा इशारा देऊनही शहरातील सलीम शेख (कुमठे) याने मारहाणीचा जुना व्हिडिओ व्हायरला केला. या प्रकरणी त्याला अटक केल्याची माहिती सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील (Kamlakar Patil) यांनी दिली.
त्रिपुरात प्रत्यक्षात घटना घडली की नाही, याची खातरजमा न करताच महाराष्ट्रात दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अमरावतीत झाला. त्यानंतर गृह विभागाने सायबर सेलला अलर्ट केले आहे. दुसरीकडे, शहर- ग्रामीणमधील सर्व पोलिस प्रमुखांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले जात आहे. विनाकारण कोणीही दोन समाजात अथवा धर्मांमध्ये संघर्ष निर्माण होईल, तेढ निर्माण होईल असे वक्तव्य, मेसेज किंवा व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम यासह इतर सोशल मीडियावर टाकणार नाही, याची दक्षता सायबर सेलच्या माध्यमातून घेतली जात आहे. तसा मेसेज अथवा व्हिडिओ तत्काळ डिलीट केला जात आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पोलिस आयुक्त बैजल यांनी नागरिकांना आवाहन करत, कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, तरीही एका तरुणाने आज तो व्हिडिओ व्हायरल केला. खूप वर्षांपूर्वीचा तो व्हिडिओ असून, पश्चिम बंगालमधील तो असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. अशा प्रकारचे जुने व्हिडिओ व्हायरल करून दोन धर्मांत तेढ निर्माण करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जात आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील म्हणाले...
दोन धर्मांमध्ये विनाकारण तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह कोणतीच गोष्ट सोशल मीडियावर टाकू नये
सोशल मीडियावर सायबर सेलचा वॉच; तेढ निर्माण करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
शहरातील एका युवकाला सदर बझार पोलिसांनी केली अटक; सोशल मीडियावर टाकला होता व्हिडिओ
पश्चिम बंगालमधील जुना व्हिडिओ व्हायरल करून दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा त्या तरुणावर आरोप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.