सोलापूर

खाजगी सावकारकीतून मित्राचे अपहरण! 24 तासात सूत्रधार अटकेत

तात्या लांडगे

त्यांच्या पथकाने या अपहरणातील मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतले असून ते आता सोलापुरच्या दिशेने येत आहेत.

सोलापूर: येथील कुमठा नाका परिसरातील विशाल पाटील यांचे 4 ऑगस्ट रोजी सोलापुरातून अपहरण झाले. त्यांच्या पत्नी व आईच्या मोबाईलवर कॉल करून संशयित आरोपींनी 30 हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास विशालला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली होती. त्या मोबाइल क्रमांकावरून सहायक पोलिस निरीक्षक ए.एन. शेख यांनी विजयपूरला धाव घेतली. त्यांच्या पथकाने या अपहरणातील मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतले असून ते आता सोलापुरच्या दिशेने येत आहेत.

बुधवारी (ता. 4) सकाळी 11 वाजता विशाल हे घरातून बाहेर पडले. सायंकाळी सहा वाजता त्यांची पत्नी पुजा यांनी त्यांना कॉल केला, परंतु त्यांचा कॉल स्विच ऑफ लागला. त्यामुळे पत्नीची चिंता वाढली. त्यावेळी विशालची आई घाबरलेल्या अवस्थेत घरी आली आणि रडू लागली. त्यांनी पुजाला सांगितले, विशालचा कॉल आला होता आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटलमधून कोणीतरी पकडून नेले आहे. समोरील व्यक्‍ती पैशांची मागणी करीत असल्याचेही त्यांनी पुजाला सांगितले.

दरम्यान, विशालच्या आईच्या मोबाइलवर एक कॉल आला आणि समोरील व्यक्‍तीने त्यांच्याकडे 30 हजारांची मागणी केली. त्यावेळी विशालही आईशी बोलला आणि पैशांची जुळवाजुळव करा, अन्यथा हे लोक मला मारून टाकतील, असेही तो बोलला. 5 ऑगस्टला सकाळी आठ वाजता एका मोबाईलवरून त्यांना कॉल आला. पैशांचा बंदोबस्त झाला का, अशी विचारणा समोरील व्यक्‍तीने त्यांच्याकडे केली. 'तुम पैसे जल्द दो, नही तो तुम्हारे मरद को खल्लास करूंगा' अशी धमकी त्या व्यक्‍तीने दिली.

त्यावेळी त्यांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ मोबाइल लोकेशनचा पत्ता शोधून काढला. सहायक पोलिस निरीक्षक शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक विजयपूरकडे रवाना झाले. त्यांनी सापळा रचून तेथील तांडा परिसरातून विशालची सुटका केली आणि सूत्रधाराला पकडले, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

ठळक बाबी....

- विशाल पाटील (रा. संजय नगर, कुमठा नाका) यांचे 4 ऑगस्टला झाले अपहरण

-30 हजार रुपयांसाठी सहाजण विजापूरहून आले सोलापुरात; सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून केले अपहरण

-विशाल पाटील व संशयित आरोपींची पूर्वीच ओळख; व्याजाने घेतलेले पैसे परत न दिल्याने रचला कट

-विजयपूर येथील तांड्यावरून पोलिसांनी सापळा रचून सूत्रधाराला पकडले; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला विशालचा जीव

-सहायक पोलिस निरीक्षक ए. एन. शेख यांची धडाकेबाज कामगिरी; आरोपीसह पोलिस पथक सोलापुरकडे रवाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT