Crime Canva
सोलापूर

पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू! नंदूर येथील घटना

नंदूर येथे पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

त्याचा अवैध व्यवसायाशी संबंध नसतानाही पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने तो पळून जात असताना पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

मंगळवेढा (सोलापूर) : कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना (Police) पाहून पळून जाताना पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्‍यातील नंदूर येथे घडली. नागेश हेगडे (वय 24) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईक संतप्त झाले होते. नातेवाइकांनी संबंधित तरुणाचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारात आणला. शेवटी चौकशी करण्याच्या अटीवर नातेवाईक शांत झाले. (A youth who fled after seeing the police in Nandur died)

नंदूर परिसरातील हेगडे कुटुंबातील एक सदस्य अवैध व्यवसाय (Illegal business) करत असल्याच्या प्रकरणावरून पोलिस या घरावर धाड टाकण्यासाठी गेले होते. यापूर्वीही या कुटुंबातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी (ता. 21) पोलिसांनी पुन्हा त्या कुटुंबाच्या घरावर धाड टाकण्याचा प्रयत्न केला असता घरातील महिला व इतर पुरुष पळून गेले. तर या वेळी नागेश नाथा हेगडे (वय 24) हा तरुणाने देखील पळून जाण्याचा प्रयत्न केला. अचानक पळून जाताना तो पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी डॉक्‍टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

त्याचा अवैध व्यवसायाशी संबंध नसतानाही पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने तो पळून जात असताना पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. संतप्त नातेवाइकांनी त्याचा मृतदेह घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. या वेळी पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये वाढती गर्दी लक्षात घेता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलिस स्टेशनला तत्काळ भेट दिली व नातेवाइकांशी चर्चा केली. दरम्यान, या प्रकरणाची पंढरपूर व मंगळवेढ्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात येत असल्याचे आदेशाचे पत्र पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी नातेवाइकांला दिले.

नंदूर परिसरामध्ये पोलिसांच्या वारंवार धाडी पडत असून यापूर्वीही पोलिसांनी एका सर्वसामान्य नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. ते प्रकरण सध्या चौकशीमध्ये प्रलंबित आहे.

पोलिसांच्या वारंवार धाडीच्या भीतीमुळे नागेश हेगडे याला कारण नसताना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अन्यथा जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

- शिवाजी केंगार, तालुकाध्यक्ष, होलार समाज संघटना, मंगळवेढा

गावामध्ये इतर अवैध धंदे असताना एकाच व्यावसायिकाला पोलिसांकडून टार्गेट करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असून हेगडे कुटुंबावरील कारवाई ही राजकीय सूडबुद्धीतून झाली आहे.

- दामोदर कांबळे, सरपंच, नंदूर, ता. मंगळवेढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT