doctor tatyarao lahane  esakal
सोलापूर

...तो तर दृष्टीदाता देवदूतच!

गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्‍टर आपल्या आईने दिलेल्या एका किडणीच्या यशस्वी रोपणातून जीवनाची कमान उंचावर नेत आहेत.

अभय दिवाणजी - सकाळ वृत्तसेवा

गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्‍टर आपल्या आईने दिलेल्या एका किडणीच्या यशस्वी रोपणातून जीवनाची कमान उंचावर नेत आहेत.

नेहमीच्या दिनश्‍चर्येनुसार मॉर्निंग वॉक, चहापान, पेपर वाचन अन्‌ अहवालाचे काम झालं. सवयीनुसार आजच्या वाढदिवसांची यादी तपासत होतो. त्यात नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) सरांचे नाव होते... आमचे पितृतुल्य... परमआदरणीय डॉक्‍टरसाहेब...थेट फोन लावला. पण नेहमीप्रमाणे त्यांचा फोन एंगेज होता. पुन्हा परत फोन येईल याची खात्री...! मोठी माणसं खरंच मोठी असतात, असा यांच्याबाबतही नेहमीचा अनुभव!

डॉ. लहाने सरांचा दहा मिनिटांनी फोन आला. बोल अभय, काय चाललंय! नेहमीच्या सुरातील ते बोल कानावर पडले अन्‌ फारच बरं वाटलं. आजचा आपला दिवस खरंच चांगला जाणार ही हमीच ती...! सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या... सरांनी हसतमुखाने धन्यवाद शब्द उद्‌गारले.. त्यातील तो आपलेपणा भावला... सरांना 23 कि 25 असं मजेत विचारलं... डॉक्‍टरांची चेष्टा करण्याइतका मी मोठा नाही... परंतु सरांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध... त्यामुळे इतक्‍या मोठ्या माणसाशी जरा सलगीनेच वागणं असतं... अरे बाबा आता बास की... 65वा वाढदिवस आहे, असं सांगताना त्यांनी मनमुरादपणे हसून दाद दिली. दरवेळेप्रमाणे पुन्हा विचारपूस... विशाला काय म्हणतीय ? बच्चे कंपनी कशी आहे ? मुलीचं काम पुण्यात की सोलापुरात ? मुलाचं इंजिनिअरिंग झालं का ? हा साऱ्या प्रश्‍नांची सरबत्ती अन्‌ ख्यालीखुशाली झाल्यावर बाकी सगळं ठिक आहे ना ! हा एक प्रश्‍न असतोच... डॉक्‍टर अन्‌ माझी पत्नी एकाच जिल्ह्यातील... त्यामुळं माहेरचं नातं... अनेकवेळा फोनवर दिलखुलास गप्पा... सोलापुरात आल्यावर मात्र नाष्ट्याचा मेनू ठरविण्यापासूनच्या गप्पांची मैफलच रंगते. माझी मुलगी तुला व्यवस्थित नांदवतेय ना? अशीही डॉक्‍टरांची हळूच एक गुगली असतेच ! वैद्यकीय शिक्षण (Education) विभागाचे संचालक असल्याने डॉक्‍टरांकडे टास्कफोर्सची जबाबदारी होती... कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत मी रुग्णशय्येवर असल्याचे कळताच, माझा अभय तुमच्याकडे ऍडमीट आहे, त्याला काही होता कामा नये, अशी संबंधित डॉक्‍टरांना तंबीच दिली होती. तू काही काळजी करु नकोस, मी आहे ना ! असा विश्‍वास दाखवत माझ्या पत्नीला धीर दिला होता.

आपल्या आयुष्यात साठीला जसं महत्त्व आहे तसं किंवा त्याहूनही काकणभर अधिक पासष्टीचं महत्व... ज्ञानदेवांनी चांगदेवांना 65 ओळी लिहून पत्र पाठवलं. त्यामुळं चांगदेव पासष्टीची आठवण येते... नेत्रतज्ज्ञ डॉ. लहाने म्हणजे गोरगरीबांचे कनवाळूच ! राज्यभरात हजारो शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी दीड लाखांवर सर्वसामान्यांच्या नेत्र शस्त्रक्रिया केल्या... या डोळ्यांनी जग पाहण्याची इच्छाच मेलेल्यांना पुन्हा एका नवसंजीवनी देत जग पाहण्याची दृष्टी दिली... लाखो लोकांच्या आयुष्यात आलेला अंधःकार दूर करत त्यांना पुन्हा एकदा "नजर' दिली..!

माझ्या समवयस्क अन्‌ पत्रकारितेतील अनेकांशी डॉक्‍टरांशी थेट संपर्क असे. आपलीही साधी ओळख असावी असं नेहमीच वाटायचं... माढ्यातील नेत्रशस्त्रक्रिया शिबिरासाठी प्रमुख पाहुणा होतो. तेव्हा डॉक्‍टरांशी झालेल्या ओळखीचे रुपांतर पुढे कौटुंबिक जिव्हाळ्यात झाले. गावाकडंचा माणूस ही आपली ओळख त्यांनी कायम ठेवली आहे. डॉक्‍टरांचा मुलगाही डॉक्‍टर... त्याच्या लग्नाचं आवर्जून आमंत्रण... अनेक मातब्बरांची हजेरी... पण सगळ्यांची अदबीनं विचारपूस... हाही अनुभव जमेस... बी.सी. गर्ल्स हॉस्टेललला भेट, कॉफी विथ सकाळ असो की एक्‍सलन्स ऍवार्ड कार्यक्रम... एका प्रेमाच्या फोनवर सरांची उपस्थिती फिक्‍स ! 2019 मध्ये डॉक्‍टरांच्या वडिलांचे निधन झाले होते... एक्‍सलन्स ऍवार्ड कार्यक्रमास येण्याचं त्यांनी आमंत्रण स्वीकारलं होतं. आम्ही सारे टेन्शनमध्ये... परंतु अक्षरशः तेराव्या दिवशी विधी पूर्ण केल्यानंतर त्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. शासकीय जबाबदारी पार पाडताना सामाजिक बांधिलकी जपत सुट्टी दिवशी (शनिवारी, रविवारी) कुठंतरी शिबिर असतंच ! अलिकडे कोरोनामुळं त्यांच्यावर बंधन आलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्‍टर आपल्या आईने दिलेल्या एका किडणीच्या यशस्वी रोपणातून जीवनाची कमान उंचावर नेत आहेत. अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागलेला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक पदावरील निवृत्तीनंतरही ते नेत्र विभागाचा कारभार सांभाळत आहेत. डॉक्‍टर शतायुषी व्हावेत, हीच प्रार्थना !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT