Modnimb-Pandharpur Railway Line esakal
सोलापूर

मोठी बातमी! पंढरपूर रेल्वेमार्गावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न; स्टेशन प्रमुखांचा ताबडतोब सिक्युरिटी कंट्रोलला फोन

रात्री उशिरापर्यंत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ डिजिटल टीम

या गाडीच्या मार्गावर या दगडांचा अडथळा आला असता तर मात्र मोठा अनर्थ घडला असता.

मोडनिंब : मोडनिंब येथे रेल्वेमार्गावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. मोडनिंब रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर पंढरपूरच्या दिशेने किलोमीटर क्रमांक ४००/६ ते ४००/७ यादरम्यान रेल्वे मार्गावर तीन ठिकाणी दगड व झाडाच्या फांद्या ठेवून अज्ञात व्यक्तीने घातपात घडविण्याचा प्रयत्न केला.

मोडनिंब स्टेशनमध्ये थांबलेले इंजिन काल (शुक्रवारी) दुपारी दीडच्या सुमारास पंढरपूरकडे निघाले होते. स्टेशन सोडतानाचा वेग कमी असल्यामुळे या इंजिनच्या लोको पायलटला रेल्वे मार्गावर दगड ठेवल्याचे आढळले. त्याने इंजिन थांबवून यासंबंधीची सूचना मोडनिंब रेल्वे स्टेशनचे स्टेशन (Railway Station) मास्तर बिनय प्रसाद यांना दिली.

प्रसाद यांनी ताबडतोब ट्रॅकचे काम चालू असलेल्या ठिकाणी इंजिनिअरिंग विभागास कळविले. या ठिकाणी काम करणारे लोक व लोको पायलट यांनी पाहणी केली असता अरण- पंढरपूर पालखी मार्गाच्या पुलाचे दगड काढून ट्रॅकवर ठेवल्याचे त्यांना आढळून आले.

स्टेशन मास्तर प्रसाद यांनी घटनेची हकीकत सोलापूर सिक्युरिटी कंट्रोलला कळविली. सिक्युरिटी कंट्रोलने पोलिस व आरपीएफ जवानांचे पथक घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पाठविले. घटनास्थळाला पोलिस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे निरीक्षक दीपक पाटील, गुन्हे प्रकटीकरणचे सुरेश निंबाळकर या अधिकाऱ्यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

..तर अनर्थ घडला असता

घडलेल्या घटनेनंतर लगेचच परळी- मिरज ही पॅसेंजर ट्रेन या मार्गावरून जाणार होती. दुपारी दोन वाजता ही गाडी मोडनिंब स्टेशनला पोचली. या गाडीच्या मार्गावर या दगडांचा अडथळा आला असता तर मात्र मोठा अनर्थ घडला असता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT