Godutai Vidi Gharkul 
सोलापूर

म्हणून "हा' पॅटर्न आला चर्चेत; आठ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 10 हजार घरकुलांची कॉ. गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था. यासह मीनाक्षीताई साने व मॉंसाहेब अशा गृहनिर्माण संस्थांच्या सर्व मिळून 15 हजार घरकुलांच्या परिसरात जवळपास 60 हजार लोकसंख्या असलेल्या परिसराला 27 मेपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला नव्हता. मात्र 28 मे रोजी 27 वर्षांचा तरुण धान्य आणण्यासाठी सोलापूर शहरात गेला. प्रतिबंधित क्षेत्रातील नातेवाईक व इतरांना भेटला व कोरोनाबाधित झाला. अशाप्रकारे कोरोना विषाणूची एंट्री गोदूताई वसाहतीत झाली. 

आज या वसाहतीत 51 रुग्ण असून, यातील अ विभागामध्ये 19, ब विभाग येथे 21 तर क विभाग येथे नऊ असे रुग्ण होते. यापैकी अ विभागातून 16 तर ब विभागामधून 19 जण पूर्ण बरे झाले. तिघांचा मृत्यू झाला. क विभागातील पाच वर्षांची मुलगी दगावली. सध्या 11 लोकांवर उपचार सुरू आहेत. यादरम्यान या भागातील क्वारंटाइन लोकांना "गोदूताई' संस्थेच्या वतीने संपूर्ण जेवण, नाश्‍ता व राहण्याची सोय उपलब्ध करण्यात आली. मात्र क विभागात जुन्या साखळीतीलच एक महिला पॉझिटिव्ह आल्या नंतर 12 दिवसांनंतर 1 ते 7 जुलैपर्यंत सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 

हेही वाचा : मोठी बातमी ! "वनसेवा' उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखांत बदल; या दिवशी होणार मुलाखती 

या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात येताच संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये निवेदन दिले. वसाहतीत फवारणी, नागरिकांची मोफत तपासणी व मोफत औषधोपचार, मास्क, सॅनिटायझर, सर्वांसाठी फिव्हर क्‍लिनिक व ज्येष्ठांना मधुमेह, रक्तदाब तपासणीची आग्रही मागणी केली. त्यानंतर 6 जून रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सहा तास चर्चा झाली. या वेळी संस्थेच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांना निमंत्रित केले. त्यांना विश्वासात घेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वनियोजन केले. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण अधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, कुंभारी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. 

प्रशासन अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार 152 तरुण स्वयंसेवकांनी 1 एप्रिलपासून 30 जूनपर्यंत कोरोना योद्धा म्हणून पोलिस व प्रशासनाला सहकार्य केले. या भागात 172 व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या सर्वसूचना, घ्यावयाची काळजी, नियम आदींची माहिती दररोज पसरवण्यात आली. तसेच प्रशासनाची परवानगी घेऊन लोकांचे प्रबोधन व जागृती करण्यासाठी रिक्षाद्वारे प्रचार करण्यात आला. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर वसाहतीतील रोजगार व कामानिमित्त परराज्यात गेलेले 1700 स्थानिक नागरिक पुन्हा वसाहतीत आले. त्यांची स्वतंत्र नोंदवही करून आरोग्य विभागामार्फत त्यांची तपासणी करून योग्य ती काळजी घेण्यात आली. 

प्रांताधिकारी यांच्यामार्फत 2800 मास्क पुरवण्यात आले. पोलिस अधीक्षकांमार्फत सॅनिटायझरच्या फवारणीसाठी एका टॅंकरची सोय करून दिली. शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या वतीने 123 टी शर्ट देऊन कोरोना योद्‌ध्यांना प्रोत्साहन देण्यात आले. संस्थेच्या पाच तरुणांना 24 तास सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाकडे सोपवण्यात आले. सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज कडादी यांनी 40 लिटर सॅनिटायझर दिले. सध्या केंद्र सरकारच्या वतीने प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ, एक किलो डाळ याप्रमाणे 677 कुटुंबांना धान्य घरपोच देण्यात आले व उर्वरित 312 कुटुंबांना देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. संपूर्ण 80 दिवस लॉकडाउनच्या कालावधीत लोकांना, श्रमिक कामगारांना जगणे जिकिरीचे होत असताना संस्था, स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, शिक्षक या सर्वांनी मिळून 4500 कुटुंबांना घरपोच अन्नधान्याची मदत दिली. तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत अशा 900 जणांना प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या पुढाकाराने प्रत्येकी पाच किलोप्रमाणे मोफत ज्वारी देण्यात आली. 

या वसाहतीच्या निर्मितीच्या वेळी लोकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी प्रत्येक घराला 300 चौरस फूट मोकळी जागा, स्वतंत्र नळ, शौचालय बांधून देण्यात आले. लोकांची प्रतिकारशक्ती वाढावी याकरिता प्रयत्न चालू आहेत. तसेच सध्या 43 लोक क्वारंटाइन आहेत तेही लवकर पूर्ण बरे होतील, अशी आशा संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री. आडम यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT