Gunaratna Sadavarte sakal
सोलापूर

ॲड. सदावर्तेंच्या अडचणीत वाढ। सोलापुरात गुन्हा दाखल; पोलिस करणार कस्टडीची मागणी

मराठा समाजाच्या आरक्षणारून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संशय घेऊन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या सातारा, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले असतानाच आता योगेश नागनाथ पवार (रा. धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ) यांनी सोलापुरातील फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॲड. सदावर्तेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणारून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संशय घेऊन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या सातारा, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले असतानाच आता योगेश नागनाथ पवार (रा. धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ) यांनी सोलापुरातील फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॲड. सदावर्तेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

ॲड. सदावर्ते यांनी २७ जून २०१९ रोजी एका टिव्ही चॅनलशी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व भारती डांगरे यांनी आरक्षणाबद्दल दिलेल्या निर्णयावरून संशय व्यक्त केला. तर न्यायमूर्ती मोरे हे मराठा जातीचे असून मराठा हे शुद्र आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सेटिंग-बेटींगमुळे न्यायालयाने आरक्षणाचा निकाल दिल्याचेही वक्तव्य ॲड. सदावर्तेंनी केले होते. त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून सार्वजनिक शांतता भंग होईल असे चितावणीखोर वक्तव्य केले आणि मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केला, असेही फिर्यादीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास देशमुख हे करीत आहेत.

  • फिर्यादीतील ठळक बाबी...
    - ॲड. सदावर्तेंनी उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेल्या निकालाबद्दल व्यक्त केला संशय
    - एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सदावेर्तेंनी न्यायमूर्ती रणजित मोरे हे मराठा जातीचे असल्याचे केले वक्तव्य
    - मराठे हे शुद्र असल्याची भाषा वापरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा न्यायाधीशांवर दबाव असल्याचा सदावर्तेंनी केला होता आरोप
    - न्यायाधीशांबद्दल द्वेषातून अवमानकारक भाषा वापरून त्यांची बदनामी केली
    - न्यायव्यवस्थेवर संशय घेऊन मराठा समाज व ओबीसी जाती, खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, वैश्य, आर्या यांच्यात तेढ निर्माण केली
    - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांमध्ये द्वेष निर्माण करून जातीय तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल असे चितावणीखोर वक्तव्य केले

पोलिस कस्टडीची होणार मागणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर विशेषत: न्यायमूर्तींवरच संशय घेऊन अविश्वास दाखविल्याप्रकरणी ॲड. सदावर्तेंविरूध्द सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपास तातडीने सुरू केला आहे. पण, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी ॲड. सदावर्तेंच्या पोलिस कस्टडीची मागणी पोलिसांकडून केली जाईल. दोन दिवसांत त्यासंदर्भात न्यायालयाकडे मागणी कळविली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT