Loksabha Election Voting sakal
सोलापूर

Loksabha Election Voting : सोलापूरात लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

राजकुमार शहा

मोहोळ : सोलापूर लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोहोळ महसूल प्रशासन सज्ज झाले असून, या प्रक्रियेसाठी एकूण 1 हजार 966 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या निवडणुकीसाठी मोहोळ विधानसभा मतदार संघातील तीन लाख 19 हजार 808 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.

या संदर्भात निवडणूक नायब तहसीलदार अनिल शहापुरे यांनी दिलेल्या माहिती नुसार, मोहोळ विधानसभा मतदारसंघात एकूण 331 मतदान केंद्र आहेत. मतदार संघात कुरुल, कौठाळी, सरकोली, लमाण तांडा व राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ ही पाच आदर्श मतदान केंद्र आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व बिनचूक पार पडावी या साठी नियुक्त केलेल्या 1 हजार 966 कर्मचाऱ्यांना मौखिक व यांत्रिक अशी दोन प्रशिक्षणे दिली आहेत. सोमवारी मतदान यंत्र घेऊन जाताना एक तासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 85 वयोगटाच्या पुढच्या व दिव्यांग अशा एकूण 196 मतदारांची मतदान प्रक्रिया पार पडली.

चालू वर्षी कडक ऊन लक्षात घेता, मतदारांना थांबण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मंडप मारण्यात येणार आहे. तसेच एखाद्या मतदाराला कुठलीही शारीरिक बाधा होऊ नये यासाठी "मेडिकल किट" उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदारांच्या मदतीसाठी व सोयीसाठी 18 वर्षा खालील मुली व मुली स्वयंसेवक म्हणून नियुक्त केली आहेत. त्यांना टी-शर्ट व टोप्या देण्यात आल्या आहेत. त्यावर मतदान केंद्रांचा क्रमांक असणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी व मतपेट्या नेआण करण्यासाठी 19 बस गाड्या व 21 जीप ताब्यात घेतल्या आहेत.

  • एकूण मतदान केंद्र- 331

  • एकूण मतदार-3 लाख 19 हजार 808

  • एकूण प्रशिक्षण-3 एकूण कर्मचारी- 1966 आदर्श मतदान केंद्र-5

मंगळवारी लोकसभेच्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मोहोळ महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असल्याची खात्री केली आहे. कर्मचारी व अधिकारी यांना विविध सूचना दिल्या आहेत. सर्वांनी मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा सचिन मुळीक-------

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहोळ विधानसभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT