Sadar Bazar Police esakal
सोलापूर

..अखेर 35 हजाराला विकलेला चिमुरडा सापडला; आईनं 'डुगु' हाक मारताच पोलिसांचेही डोळे पाणावले, असं स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं?

एका विवाह समारंभाला गेलेल्या मीराबाईचा आयुष्य ३ मे रोजी अचानक गायब झाला.

सकाळ डिजिटल टीम

चार महिन्यानंतर पोलिसांचा फोन आल्याने त्यांना आपल्या लेकराचं काही बरेवाईट झाले की काय, याची चिंता होती.

सोलापूर : लष्कर परिसरातील शितलादेवी मंदिराजवळील सामुदायिक विवाह समारंभाला गेलेल्या मीराबाईने मंदिरातील एका खोलीत बाळाला झोपविले होते. विवाह उरकून खोलीकडे आल्यावर आयुष्य त्याठिकाणी नव्हता.

आई-वडिलांनी त्याला इतरत्र शोधले, पण तो सापडलाच नाही. शेवटी त्यांनी सदर बझार पोलिस (Sadar Bazar Police) ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. पोलिसांनीही चिमुकल्याला शोधले, पण सापडला नाही. चार महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी ३५ हजाराला विकलेल्या त्या चिमुकल्याला शोधून काढलेच.

हातावरील पोट असलेलं मीराबाई व अजयसिंग यांचे कुटुंब. ११ महिन्यांपूर्वी त्यांच्या कुटुंबात आनंदाचा क्षण आला. मीराबाईने आयुष्याला जन्म दिला, काही महिन्यांनी नामकरण देखील झाले. ११ महिन्यांच्या आयुष्याला अजून नीट चालता- बोलता सुद्धा येत नव्हते. पण, एका विवाह समारंभाला गेलेल्या मीराबाईचा आयुष्य ३ मे रोजी अचानक गायब झाला.

मुलाच्या विरहाने व्याकूळ मीराबाईने त्याचा दिवस-रात्र शोध घेतला, पोलिसांचाही शोध सुरु होता. पण, ११ महिन्याच्या आयुष्यचा चार महिने होत आले तरीही शोध लागत नव्हता. पोलिसांना फोनवरून तर कधी प्रत्यक्ष ठाण्यात जाऊन त्यांची चौकशी सुरु होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यासंबंधी सूचना केल्या होत्या.

सदर बझार पोलिसांनी त्याची विक्री करणाऱ्या व खरेदी करणाऱ्या दोन संशयित महिलांना नवीन विडी घरकुल परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी मीराबाई व अजयसिंग यांना बोलावून आयुष्यला त्यांच्या स्वाधीन केले. मीराबाईने आयुष्यला ‘डुगु’ म्हणून हाक दिली आणि पोलिसांकडून तो आईकडे झेपावला. हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहून पोलिसांचेही डोळे पाणावले.

पोलिसांनी खात्री केली अन् ...

आयुष्यचा शोध लागल्यानंतर सदर बझार पोलिसांनी मीराबाई व अजयसिंग गोटीवाले यांना फोन केला. चार महिन्यानंतर पोलिसांचा फोन आल्याने त्यांना आपल्या लेकराचं काही बरेवाईट झाले की काय, याची चिंता होती. लगबगीने ते पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते.

पण, तुमचा आयुष्य सुखरूप असून तो सापडल्याचे पोलिसांनी सांगताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांच्या कुशीतील डुगु त्यांना ओळखतो का ते पोलिसांनी पाहिले. आईने त्याला हाक मारताच तो काही क्षणात मीराबाईच्या कुशीत आला. पोलिस उपनिरीक्षक सचिन माळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आयुष्यला शोधून काढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT