Devendra Fadnavis Sakal
सोलापूर

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे आश्‍वासन दिल्यानंतर सरकारच गेले - देवेद्र फडणवीस

मी सभा घेण्याकरिता आलो. 24 गावाची मंगळवेढा उपसा सिंचन योजना करणार असे आश्‍वासन दिले आणि आश्‍वासन दिल्यानंतर सरकारच गेले.

हुकूम मुलाणी ​

मी सभा घेण्याकरिता आलो. 24 गावाची मंगळवेढा उपसा सिंचन योजना करणार असे आश्‍वासन दिले आणि आश्‍वासन दिल्यानंतर सरकारच गेले.

मंगळवेढा - स्व. सुधाकरपंत परिचारक निवडणूकीला उभे होते, त्यावेळी मी सभा घेण्याकरिता आलो. 24 गावाची मंगळवेढा उपसा सिंचन योजना करणार असे आश्‍वासन दिले आणि आश्‍वासन दिल्यानंतर सरकारच गेले. पण मी सांगीतले होते पुन्हा येईन, त्याप्रमाणे ही योजना देखील मी पुन्हा यायची वाट बघत बसल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नंदूर येथे बोलताना व्यक्त केले.

आवताडे शुगर अ‍ॅन्ड डिस्टलरीज प्रा.लि.च्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत मधल्या काळातील सरकारने या योजनेची फाईल पुढे सरकारवलीच नाही. सुदैवाने पुन्हा तुमच्या आशिर्वाद समाधान दादा मिळाला आणि ते निवडून दिले. समाधान दादाच्या सभेत देखील त्या योजनेचे आश्‍वासन दिले.

तुम्ही 106 वा आमदार दया, मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो. त्याप्रमाणे करेक्ट कार्यक्रम केला देखील पांडूरंगाचा आशीर्वाद मिळाला आणि सरकार आलं. या योजनेला मोठया प्रमाणात गती दिली. मधल्या काळात आ. आवताडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माजी प्रशांत परिचारक हे देखील माझ्याकडे वारंवार आले. आज त्या योजनेच्या सगळया मान्यता घेतल्या मुख्यमंत्राची सही घेतली. त्यावेळी लक्षात आले. हे अंदाजपत्रक 2017-18 नुसार जुन्या दरपत्रकानुसार असून, त्यानुसार टेंडर काढले की पुन्हा अडचणी येण्याऐवजी नियोजन विभागाने नवीन दरसुचीनुसार प्राकलन करण्याचे सुचना दिल्या. नवीन दरानुसार प्राकलन आल्यानंतर मंत्रीमंडळासमोर ठेवू आणि 24 गावाचा पाणी प्रश्‍न सुटेल व आ. आवताडे यांना पुन्हा लोकासमोर ताठ मानेनेच जाता येईल असा विश्‍वास देत मंगळवेढ्यातील प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात आ. आवताडे यांनी केलेल्या कामाच्या मागण्याची नोंद घेतली.

मागणी केलेले सर्व प्रश्‍न मार्गी लावून भविष्यात कामाच्या भरोश्यावर पुन्हा मत मागण्यास जावू असा विश्‍वास देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. प्रास्ताविकात आ. आवताडे म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यामुळे बंद झालेला नंदूरचा कारखाना सुरू केला. त्यातून हजारोना रोजगार मिळाला. तीन महिन्यात 600 कोटीचा निधी मतदारसंघासाठी दिला असून, मंगळवेढ्याचे राजकारण पाण्यावर झाले या पाण्याने राजकारणाची आग भडकावली. 718 कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्रीच तगादा लावत आहे.

बसवेश्‍वर व चोखोबा स्मारक, भिमा नदीच्या पात्रात कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, गादेगाव व निंबोणी ग्रामीण रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयाचे सामान्य रूग्णालयात वर्ग, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्वच शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी, पौट साठवण तलावाचा प्रश्‍न, माण नदीला कालव्याचा दर्जा देण्याची मागणी करताना ऊसदराचा प्रश्‍न देखील सोडवण्याची मागणी केली.

यावेळी खा. जयसिंध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख, आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, आ. शहाजी पाटील, लक्ष्मण ढोबळे, प्रशांत परिचारक, हर्षवर्धन पाटील, उद्योजक संजय आवताडे, सचिन जाधव, शशिकांत चव्हाण, विष्णुपंत आवताडे, सोमनाथ आवताडे, विनायक यादव, कार्यकारी संचालक मोहन पिसे, ज्ञानेश्‍वर बळवंतराव, विजयराज डोंगरे, सरोज काझी, आंबादास कुलकर्णी, प्रदीप खांडेकर, सुरेश भाकरे, भारत निकम, सचिन शिवशरण, सुधाकर मासाळ, लाडिक डोके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT