अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट हे ऊर्जा आणि रोजगार देणारे तीर्थक्षेत्र आहे. त्यासाठी आम्ही मंजूर केलेल्या 166 कोटींच्या विकास आराखड्यातील उर्वरित 146 कोटी रुपये त्वरित वितरित करा, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते अक्कलकोट येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवानंद पाटील, नगराध्यक्षा शोभा खेडगी, दीप्ती केसुर, भीमाशंकर इंगळे, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, बसलिंगप्पा खेडगी, यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे तसेच अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गीचे भाजप नगरसेवक, सर्व भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
सोमवारी सकाळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगरुळे हायस्कूल बायपास चौक ते शिवपुरी या नवीन सिमेंट रस्त्याचा भूमिपूजन, एवन चौकातीळ नव्याने बांधलेल्या 28 गाळ्यांचा लोकार्पण सोहळा, कारंजा चौक ते एमएसईबी चौक रस्त्याच्या कामाचे लोकार्पण सोहळा याशिवाय हन्नूर चौकाचे सुशोभिकरण व रस्ता कामाचे भूमिपूजन आदी विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम झाले. यानंतर अक्कलकोट बसस्थानक समोरील मल्लिकार्जुन मंदिराजवळ जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना अक्कलकोटचा विकास आराखडा 167 कोटी रुपयांचा मंजूर केला होता. त्यातील वीस कोटी सुरवात म्हणून दिले होते. जनमताच्या विरोधी सरकार जरी आले असले तरी हा आराखाडा भाजपचा नाही तर तो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नगरीचा विकास आरखाडा आहे. यावेळी अण्णाराव बाराचारे, सुनील बंडगर, परमेश्वर यादवाड, अंकुश चौगुले राजशेखर मसुती, भीमाशंकर इंगळे, सुरेखा होळीकट्टी आदी सर्वांनी केंद्र सरकारचे काम व महाविकास आघाडीची निष्क्रियता यावर बोट ठेवत मनोगत व्यक्त केले.
ठळक वैशिष्ट्ये
केवळ दोन दिवसांच्या तयारीत अक्कलकोट शहर भगवे कमानी व ध्वजमय
महाविकास आघाडी ही नाकर्ते असल्याची केली गेली टीका
लस ही मोदींची नसून देशाच्या शक्तीचे प्रतीक असल्याचे व्यक्त झाले मत
सरकार हलतही नाही व डुलतही नाही तर फक्त वसुली सुरू असल्याची टीका
"देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटला एकदा यावे, अशी अक्कलकोटकरांची इच्छा होती. ती पूर्ण झाली. अक्कलकोटकर केलेल्या कामाची जाण ठेवणारे आहेत. आघाडी सरकार अद्याप एक दमडीही दिलेली नाही. अक्कलकोटचे ऊस बिल अद्याप मिळाले नाहीत त्यासाठी आपण प्रयत्न करावेत."
- सचिन कल्याणशेट्टी, आमदार
"अक्कलकोटवासियांच्या मनात जी सुप्त इच्छा आहे ती स्वामी समर्थ यांनी पूर्ण करावेत अशी प्रार्थना करतो. देवेन्द्र फडणवीस हे महाराष्ट्रभर फिरले आणि लोकांना मदतीचा हात दिले. संकटाने घाबरून न जाता संघर्ष करत राहा त्यात यश नक्की आहे."
- सुभाष देशमुख, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.