akkalkot vidhan sabha sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 :कोण सरस ठरणार, ‘दांडगा अनुभव’ की ‘चाणक्य नीती’?

Akkalkot Vidhan Sabha Election 2024 : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत अटीतटीची व लक्षवेधी बनली आहे. कोण सरस ठरणार, ‘दांडगा अनुभव’ की ‘चाणक्य नीती’?

सकाळ वृत्तसेवा

चेतन जाधव : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत अटीतटीची व लक्षवेधी बनली आहे. एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी काँग्रेस व भाजपत मोठी चुरस दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी व रासप हे कोणाला ‘धक्का’ देणार याबद्दल मोठी चर्चा मतदारसंघात आहे.

माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा ‘दांडगा अनुभव’ तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची ‘चाणक्य नीती’ यात कोण सरस ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक लक्षवेधी ठरल्याने संपूर्ण जिल्ह्यासह कर्नाटक राज्यात हा मतदारसंघ चर्चिला जात आहे.

सतरा वर्षे आमदारकी व त्यामधील पाच वर्षे राज्यमंत्रिपद भूषविलेले माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे. दांडगा व थेट जनसंपर्क ही सिद्धाराम म्हेत्रे यांची जमेची बाजू समजली जाते.

प्रारंभी निवडणुकीत माघारी पडलेले सिद्धाराम म्हेत्रे यांनी मुसंडी मारत निवडणूक चुरशीची बनवली आहे.

उजनीचे पाणी कुरनूर धरणात आणणे, सिद्धाराम- शंकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेकांना पोलिस भरतीतून रोजगार निर्माण करणे, सिंचनाचे क्षेत्र वाढविणे, साखर कारखाना उभारून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याचे काँग्रेस उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे मतदारांसमोर मांडत आहेत.

त्यांच्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रणिती शिंदे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मित्रपक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील यांना प्रचारात आणून रंगत आणली आहे.

मायक्रो नियोजनात अत्यंत हुशार असलेले, चाणक्य नीती वापरणारे भाजप उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रारंभी जोरदार मुसंडी मारलेली होती. आता निवडणूक अटीतटीची झाली आहे.

शेकडो कोटींची विकासकामे, एसटी बसस्थानकाचे प्रगतिपथावरील असलेले बांधकाम, श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे जीर्णोद्धार, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी व पाणीटंचाई दूर होण्यासाठी अमृत-२ ही योजना, देगाव एक्स्प्रेस कालव्याला मोठा निधी, कुरनूर धरणाला सुप्रमा मंजुरी आदी विकासकामांचा हवाला देत कल्याणशेट्टींनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. मागील वेळेस पाठिंबा दिलेले माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व त्यांचा गट यावेळेस वेगळी भूमिका घेऊन काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजपला धक्का बसला आहे.

मात्र आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर नाराज असणारा आनंद तानवडे यांचा गट आमदार कल्याणशेट्टी यांच्याशी जुळवून घेत पाठिंबा दिल्याने कल्याणशेट्टी यांना दिलासा मिळाला आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेत भाजप उमेदवार कल्याणशेट्टी यांनी मोठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. यंदा पाटील गटाच्या पाठिंब्याशिवाय निवडणूक जिंकून दाखविण्याचा चंग भाजपच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी हे कोणतेही काम नियोजनबद्ध करीत असतात. त्यांनी पूर्ण प्रचाराची यंत्रणा गेल्या तीन महिन्यांपासून नियोजनबद्ध आखलेली होती. त्याचा इम्पॅक्ट आता जाणवत आहे. तसेच सिद्धाराम म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे यांनी सोशल मीडियावरील प्रचार यंत्रणा तसेच जाहीर सभांचे नियोजन अत्यंत सूक्ष्मरीत्या राबविल्याने पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष भाजपला सोशल मीडियावर जशास तसे उत्तर देत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे संतोषकुमार इंगळे हे मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती असून, अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ गावचे सुपुत्र आहेत. वंचितचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी दिवसरात्र कष्ट घेत आहेत. तसेच रासपचे सुनील बंडगर यांनी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची सभा अक्कलकोटला ठेवून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन निवडणुकांमधील मतदान २०१४

  • एकूण मतदार संख्या ३,३३,००१

  • झालेले मतदान २,१४,२४६

  • उमेदवार मिळालेली मते

  • सिद्धाराम म्हेत्रे ९७,३३३

  • सिद्रामप्पा पाटील ७९,६८९

  • फारुक शाब्दी २२,६५१

२०१९

  • एकूण मतदार संख्या ३,४६,४९८

  • झालेले मतदान २,१५,२६१

  • उमेदवार मिळालेली मते

  • सचिन कल्याणशेट्टी १,१९,४३७

  • सिद्धाराम म्हेत्रे ८२,६६८

  • धर्मराज राठोड ६,६३०

  • यंदाचे प्रमुख उमेदवार (२०२४)

  • एकूण उमेदवारांची संख्या १२

  • एकूण मतदार संख्या ३,८३,९१३

  • उमेदवार

  • सचिन कल्याणशेट्टी (भाजप)

  • सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस)

  • संतोषकुमार इंगळे (वंचित बहुजन आघाडी)

  • सुनील बंडगर (रासप)

    #ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT