सोलापूर

शेतीच्या इतिहासात वाजली धोक्‍याची घंटा..! 

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) परिसरातील द्राक्षबागांवर अचानक हुमणीच्या किडींनी हल्ला केला. जमिनीतून पिकांच्या मुळ्यांवर आपली उपजीविका करणाऱ्या हुमणीच्या भुंगेऱ्यांनी मात्र द्राक्षबागेवरच हल्ला चढवला. या घटनेमुळे रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या अतिवापरामुळे पर्यावरण धोक्‍यात आल्याची घंटा वाजल्याची शेतीच्या इतिहासात नवी नोंद झाली आहे.


एकरी एक ते दीड हजार रुपये खर्च 
रोपळे (ता. पंढरपूर) परिसरातील मेंढापूर भागातील एप्रिल महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षबागांवर शुक्रवारच्या रात्री हुमणी अळीच्या भुंगेऱ्यांनी द्राक्षबागांवरच हल्ला चढवला. त्यामुळे शेतकऱ्यांनी या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रातोरात रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली. त्यासाठी एकरी एक ते दीड हजार रुपये शेतकऱ्यांचे खर्च झाले. 

हेही वाचा : मुंबई, पुण्यात रुग्ण जास्त तरी दारु विक्री, मग सोलापुरात का नाही? 
भुंगेऱ्यांवर काहीच परिणाम नाही 

रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमुळे हुमणीच्या भुंगेऱ्यांवर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हुमणीचे नर-मादी भुंगेरे साधारण मार्च ते मे महिन्यात बांधावरील कडुनिंब व गुळवेलासारख्या वनस्पतींची पाने खाऊन आपली उपजीविका करतात. याच दरम्यान नर-मादीचे मिलन होते. त्यानंतर हे भुंगेरे शेताच्या भळींमध्ये शिरून अंडी घालतात. 

ही चिंतेची बाब 
पोषक वातावरण तयार होताच अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पिकांचे अर्धवट कुजलेले अवशेष व कोवळ्या मुळ्या खातात. त्यामुळे उभी पिके वाळून जातात. सध्या हे भुंगेरे कडुनिंब आणि शेतातील द्राक्षबागांवर मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. रात्रीच्यावेळी हे भुंगेरे द्राक्षबागेची पाने कुरतडून खात आहेत. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत. जागतिक पर्यावरणदिन साजरा केला जात असतानाच अशा घटना घडू लागल्या आहेत. ही चिंतेची बाब सर्वसामान्यांसमोरही आली आहे. 

अचानक भुंगे पाने खाऊ लागले 
रात्रीच्या अंधारात अचानक भुंगे आमच्या द्राक्षबागेत येऊन बागेची पाने खाऊ लागले. हे भुंगे कोणते आहेत याबाबतही काही माहिती नाही. त्यामुळे यावर नेमकी फवारणी काय करावी हेच समजत नाही. 
- शिवाजी व्यवहारे, 
शेतकरी, रोपळे बुद्रूक, पंढरपूर 

बागेचे कीड व रोगाचे व्यवस्थापन 
आमच्या द्राक्षबागेत आम्ही रासायनिक कीटक व बुरशीनाशकांचा अतिरेक करत नाही. त्यामुळे आमच्या बागेत अद्यापही हुमणीचे भुंगेरे आलेले नाहीत. पर्यावरणाचा समतोल राहील असेच आम्ही बागेचे कीड व रोगाचे व्यवस्थापन करतो. 
- दत्तात्रय भोसले, तज्ज्ञ शेतकरी, सरकोली, पंढरपूर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना प्रवेशानंतर जयश्री जाधवांचं सतेज पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाल्या, 'त्यांना सांगण्याची गरज वाटली नाही'

Pune Fire: पुण्यात पार्किंगवरुन वाद; माजी सैनिकाने झाडली गोळी; नेमकं काय घडलं?

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

SCROLL FOR NEXT