All the dams in Nira valley filled up relief to farmers in Pune Satara Solapur districts 
सोलापूर

नीरा खोऱ्यातील सर्व धरणे भरली; पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा 

मिलिंद गिरमे

लवंग (ता. माळशिस, जि. सोलापूर) : नीरा खोऱ्यातील चारही धरणे पूर्ण भरल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात उशिरा पाऊस झाल्याने धरणे भरतील की नाही, कधी भरतील याकडे लाभधारकांचे लक्ष लागले होते. परंतु प्रथम गुंजवणी, वीरनंतर भाटघर धरण आणि शेवटी नुकतेच देवघर धरण 100 टक्के भरले आहे. 
उन्हाळ्यात नीरा नदी खोऱ्यातील सर्व धरणाची पाणी पातळी खालावली होती. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी असणाऱ्या नीरा नदी खोऱ्यातील या धरण क्षेत्रात यंदा उशिरा पाऊस सुरू झाला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या धरण क्षेत्रात सुरू होणारा पाऊस यंदा मात्र परतीच्या सुरू झालेल्या पावसावर ही धरणे भरली. आणि डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. भोर तालुक्‍यातील भाटघर धरण गतवर्षी चार ऑगस्टला भरले होते. ते यंदा 20 ऑगस्टला भरले. त्यापाठोपाठ 11.91 टीएमसी क्षमता असलेले नीरा-देवघर धरण 24 ऑगस्टला भरले. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला आणि भाटघर धरण क्षेत्रापेक्षा नीरा-देवघर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे देवघर धरण भरण्यास उशीर झाला. भाटघर, देवघर, गुंजवणी धरणे भरून वाहिली की या धरणातून सोडलेले पाणी वीर धरणात येते आणि वीरमधून नीरा डावा, उजवा कालवा आणि नीरा नदीत पाणी सोडले जाते. नीरा नदीला यंदा वीर धरणातून प्रथम 12 ऑगस्टपासून 800 क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली गेली होती. पाऊस वाढल्याने तो 15 ऑगस्टला 40 हजार 462 पर्यंत उच्चांकी विसर्ग गेला होता. 

संपादन : वैभव गाढवे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी पुन्हा गुवाहाटीला? नेमकं कारण काय?

ऑक्टोबरमध्ये कुठल्या झाडाला आंबे लागतात? 'लाडकी बहीण'वरून अमृता खानविलकर ट्रोल, नेटकरी म्हणाले- चंद्रा बाई..

Vi 5G Network : जिओ अन् एयरटेलचं टेंशन वाढणार? Vi 5G नेटवर्कचा लवकरच शुभारंभ; या तारखेपासून सुरू होणार सुपर स्पीड सेवा

तासगावला 'तुतारी' विरुद्ध 'घड्याळ'; रोहित पाटलांना घेरण्यासाठी बेरजेचं राजकारण, धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता

दोन राजकीय घराण्यात पुन्हा अस्तित्वाची लढाई; शंभूराज देसाई-पाटणकरांमध्ये अटीतटीची लढत, देसाई साधणार हॅट्‌ट्रिक?

SCROLL FOR NEXT