सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीला प्रवेश! Canva
सोलापूर

सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीला प्रवेश !

सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीला प्रवेश! "या'मुळे "आर्टस्‌'चे शिक्षक होणार अतिरिक्‍त

तात्या लांडगे

महाविद्यालय स्तरावर मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश दिला जाणार आहे.

सोलापूर : अकरावी प्रवेशाची "सीईटी' (CET) घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने (High Court) रद्द ठरविला. त्यामुळे आता महाविद्यालय स्तरावर मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश दिला जाणार आहे. सोलापूर (Solapur) शहर-जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या एकूण 76 हजार 736 जागा आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विद्याशाखेला प्रवेश मिळेल, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर (Bhaskar Babar) यांनी दिली.

जिल्ह्यात अकरावीचे विज्ञान शाखेची 198 महाविद्यालये असून कला व वाणिज्य शाखेची 326 महाविद्यालये आहेत. यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा होऊ शकलेली नाही. त्यामुळे निकालाची टक्‍केवारी वाढली आहे. दरवर्षी एटीकेटी (एक-दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी) विद्यार्थ्यांसह कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कल कला शाखेकडे असतो. मात्र, यंदा जवळपास 60 टक्के विद्यार्थ्यांनी 75 टक्‍क्‍यांहून अधिक गुण घेतले आहेत. त्यामुळे कला शाखेऐवजी विज्ञान, वाणिज्य शाखेसह आयटीआय, बी-फार्मसी, डिप्लोमा इन इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर कला महाविद्यालये ओस पडण्याची भीती तेथील शिक्षकांना वाटू लागली आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास तुकड्या बंद पडतील आणि आपण अर्धवेळ तथा अतिरिक्‍त होऊ, याची चिंता त्यांना सतावू लागली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात आणखी काही महाविद्यालये प्रस्तावित असून त्यांनाही मान्यता मिळेल. अनेक महाविद्यालयांनी क्रॉप सायन्ससह अन्य अभ्यासक्रमांना मान्यता मागितली आहे. त्यामुळे कला शाखेतील शिक्षकांवर अतिरिक्‍त होण्याची टांगती तलवार कायम राहील, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, अकरावी प्रवेशाला पुढील आठवड्यात सुरवात होणार असून 20 सप्टेंबरनंतर अध्यापनाला सुरवात करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

"सीईटी' रद्द झाल्यामुळे आता अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होतील. परंतु, मेरिट लिस्टनुसारच संपूर्ण प्रक्रिया राबविली जाईल. पुढील आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून सर्वांनाच त्यांच्या आवडत्या शाखेला प्रवेश मिळेल.

- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

शाखानिहाय प्रवेश क्षमता

  • शास्त्र (विज्ञान) : 29,237

  • कला (आर्टस्‌) : 36,171

  • वाणिज्य (कॉमर्स) : 11,328

  • एकूण : 76,736

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT