मायक्रो फायनान्स कंपनीची फसवणूक! कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल Sakal
सोलापूर

मायक्रो फायनान्स कंपनीची फसवणूक! कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

मायक्रो फायनान्स कंपनीची फसवणूक! कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

राजकुमार शहा

शाखाधिकारी ठाकूर यांनी गावांबाबत माहिती घेऊन व्यवहाराची नोंद तपासली असता, बचत गटाच्या नोंदीची व कर्जाची परतफेडीच्या नोंदीची तफावत आढळली.

मोहोळ (सोलापूर) : मदुरा मायक्रो फायनान्स कंपनीच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला सभासदांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या हप्त्याची रक्कम फायनान्स कंपनीत न भरता 48 सभासदांची एकूण 1 लाख 75 हजार 411 रुपये इतकी रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरून फायनान्स कंपनीची फसवणूक (Fraud) केली. तसेच पैशाचा अपहार केल्या प्रकरणी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अकोलेकाटी येथील किरण गौतम सर्वगोड याच्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात (Mohol Police Station) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

ही घटना 24 ऑक्‍टोबर रोजी घडली. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदुरा मायक्रो फायनान्स या कंपनीच्या माध्यमातून मोहोळ शाखेमध्ये फायनान्स रिलेशनशिप असोसिएट या पदावर किरण गौतम सर्वगोड हा काम करत होता. या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक सुविधा पुरवण्याचे काम करण्यात येते. कंपनीच्या नियमानुसार कर्जपुरवठा करणे व कर्ज वाटप करणे, दिलेल्या कर्जाचे हप्ते संकलन करणे व नवीन सभासद तयार करणे अशी कामे सर्वगोड करत होता. दरम्यान, 1 ऑक्‍टोबर रोजी तो कामावर होता. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने काम बंद होते. पुन्हा दोन दिवस कामावर तो न आल्याने शाखाधिकारी सूरजितसिंग बालाजी ठाकूर यांनी त्याला कामावर न येण्याबाबत विचारले असता, त्याने, माझी पत्नी आजारी असल्याने मी मुंबईला आलो असल्याचे सांगितले. पुन्हा तो कामावर लवकर हजर होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शाखाधिकारी ठाकूर यांनी त्याच्याकडे असलेल्या गावांबाबत माहिती घेऊन व्यवहाराची नोंद तपासली असता, बचत गटाच्या नोंदीची व कर्जाची परतफेडीच्या नोंदीची तफावत आढळली.

यामध्ये अखत्यार मुलाणी (रा. पडसाळी) यांचे 50 हजार रुपये, गुरुदेव बचत गटातील एका महिलेचे एक हजार 730 व सिद्धिविनायक बचत गटातील एका महिलेचे 5 हजार 500 रुपये यासह 45 सभासदांच्या कर्जाच्या परतफेडीच्या हप्त्याच्या रकमा सभासदांकडून घेऊन फायनान्स कंपनीत न भरता सदरची रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरून कर्जदार सभासदांची व फायनान्स कंपनीची एकूण 1 लाख 75 हजार 411 रुपयांची फसवणूक केली व रकमेचा अपहार केल्याप्रकरणी किरण सर्वगोड याच्यावर शाखाधिकारी ठाकूर यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल माने ही करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT