solapur congress meeting sakal
सोलापूर

पक्ष निरीक्षकांसमोरच सोलापूर काँग्रेसचा महत्त्वाचा ठराव! सोलापूर लोकसभेची उमेदवारी प्रणिती शिंदे यांनाच द्यावी

सोलापूर लोकसभेची निवडणूक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली जाणार आहे. लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी मिळावी, असा ठराव शहर-जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत एकमताने करण्यात आला.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर लोकसभेची निवडणूक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली जाणार आहे. लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी मिळावी, असा ठराव शहर-जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत एकमताने करण्यात आला आहे. आता तो पक्षश्रेष्ठींना पाठविला जाणार आहे.

सोलापूर लोकसभा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजीमंत्री बसवराज पाटील व समन्वयक माजीमंत्री रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे सोमवारी (ता. १४) बैठक झाली. यावेळी माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, धनाजी साठे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, शहराध्यक्ष चेतन नरोटे, बाबा मिस्त्री आदी उपस्थित होते.

यावेळी बसवराज पाटील म्हणाले, ७० वर्षात काँग्रेसवर अनेक संकटे आली, पण सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. आता काही कारणांमुळे या मतदारसंघात काँग्रेसचा दोनवेळा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतरची सर्वात वाईट परिस्थिती देशात असून आता काँग्रेसच जनतेसाठी पर्याय आहे. आमदार प्रणितींचे काम कौतुकास्पद असून पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केलेला ठराव पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

श्री. बागवे म्हणाले, महागाई, बेरोजगारी, जातीयवाद, महिलांवरील अत्याचार, शेतकरी- कामगार विरोधी धोरणांमुळे मोदी सरकारविरोधात वातावरण आहे. काँग्रेससाठी चांगले वातावरण असून त्याचा लाभ उठविण्यासाठी पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन बूथ सक्षम करायला पाहिजे.

या बैठकीसाठी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अश्फाक बळोरगी, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, सुशिला आबूटे, अलका राठोड, महराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, शहर महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, महिला कार्याध्यक्षा अनिता म्हेत्रे, तालुकाध्यक्ष हरिष पाटील, सुलेमान तांबोळी, हनमंतु मोरे, प्रशांत साळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे, रफीक ईनामदार, बाळासाहेब शेळके, प्रवक्ते अशोक निंबर्गी, जिल्हा युवक अध्यक्ष सुनंजय पवार,

शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण, शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मयूर खरात, राजेश पवार, भीमाशंकर टेकाळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, अरुण साठे, अंबादास करगुळे, मध्य विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे, पंडित सातपुते, प्रवक्ते नागनाथ कदम, भीमाशंकर जमादार, राजन कामत, केशव इंगळे, विश्वनाथ साबळे, ए. डी. चिनिवार, शकील मौलवी, एन. के. क्षीरसागर, पशुपती माशाळ, विवेक कंन्ना, राजेंद्र शिरकुल, हाजिमलंग नदाफ, अनिल मस्के, हसीब नदाफ, बसवराज म्हेत्रे, सुभाष चव्हाण, आझम सैफन, रामसिंग आंबेवाले, वसिष्ठ सोनकांबळे, जेम्स जंगम, श्रीकांत वाडेकर, प्रवीण जाधव, अनंत म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, अझरूद्दीन शेख, भोजराज पवार, हारून शेख, शोहेब महगामी, प्रवीण वाले, विजयकुमार हत्तूरे, अशोक कलशेट्टी, सुदर्शन अवताडे, मोतीराम चव्हाण, रफीक चकोले, सिद्धाराम चाकोते, किशोर पवार, सुमन जाधव,

सिद्राम सलवदे, राहुल वर्धा, करिमुनिस्सा बागवान, संघमित्रा चौधरी, अप्पासाहेब बगले, जाबिर अल्लोळी, पारुबाई काळे, अरुणा वर्मा, लता गुंडला, अंजली मंगोडेकर, शुभांगी लिंगराज, पांडुरंग चौधरी, संजय गायकवाड, दिनांनाथ शेळके, अनिल जाधव, नूर अहमद नालवार, लखन गायकवाड, एजाज बागवान, धौंडप्पा तोरनगी, श्रीशैल रणखांबे, दिनेश म्हेत्रे, किरण गायकवाड, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, अनवर शेख, वाहिद नदाफ, दीपक फुले, महेश काळे, सायमन गट्टू, नासिर बंगाली, इरफान शेख, श्रीकांत दासरी, राजेश झंपले, शकील शेख, श्रीनिवास पोटाबत्ती, शकूर शेख, कालिदास काळपगार, बसू कोळी, रोहित मनसावाले, शिवाजी सालुंखे, मनोहर साळुंखे, दशरथ सामल, शाहु सलगर, शंकर म्यागेरी,

धीरज खंदारे, राज शिंदे, श्रीशैल रणधीरे, समीर काझी, महेंद्र शिंदे, शुभांगी लिंगराज, चंद्रकांत टिक्के, मनोहर चकोलेकर, देवेंद्र सैनसाखले, इब्राहिम कलबुर्गी, मेघश्याम गौडा, नागनाथ शावने, जितराज गरड, मुमताज तांबोळी, सलीमा शेख, रेखा बिनेकर, मुमताज मदर शेख, स्नेहल शिंदे, मुमताज शेख, चंदा काळे, विजयालक्ष्मी झाकने, रुकैयाबानु बिराजदार, नीता बनसोडे, शिवशंकर अंजनाळकर, मनीषा भोसले, बसंती साळुंखे, शैलजा शेळके, अप्पु शेख, महादेव चुंगी, मुश्ताक लालकोट, लता सोनकांबळे, बाबूराव जाधव, महमद शेख, पुजा नेल्लूलवार, जब्बार शेख, मिना गायकवाड, अनिता भालेराव, रोहित पाटील, हनमंतु रूपनर, इब्राहिम रचभरे, दीपक मठ, मुद्दसर बिराजदार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, 'या' ६५ नेत्यांच्या नावांचा समावेश

Maharashtra Vidhan Sabha: दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अन् दोन राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागा वाटपात कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?

Bhushan Pradhan & Anusha Dandekar : "दादा-वहिनी" भूषण-अनुषाच्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स ; डेटिंगची रंगली चर्चा

Ulhasnagar News : कॉलेज, डॉक्टरांवर निवडणूक जनजागृतीची जबाबदारी; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महानगरपालिकेने कसली कंबर

Vikramgad Assembly Assembly Election 2024 : मोखाड्यात भाजप मध्ये इनकमिंग सुरू

SCROLL FOR NEXT