Anganwadi workers Boycott of cm eknath shinde programme strike against government sakal
सोलापूर

Solapur : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात आक्रोश; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार; सोमवारपासून उपोषण

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मानधन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २०) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. काळ्या साड्या परिधान करून हाती घेऊन आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह राज्य सरकार विरोधात ‘हाय हाय’च्या घोषणा देत आक्रोश व्यक्त केला.

महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवावे, त्यांना दरमहा पेन्शन मिळावी, त्यांना ग्रॅच्युइटी द्यावी, याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव सादर केले आहेत. त्यासंबंधीचा आदेश विनाविलंब काढावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी राज्यभरातील जिल्हा परिषदांवर मोर्चा काढला.

त्यानुसार सोलापुरात अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. काळ्या साड्या परिधान करून आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत राज्य सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी हेमा गव्हाणे, अन्नपूर्णा वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदांसमोर जेलभरो

प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सोमवार (ता. २३) पासून मुंबईत मंत्रालयासमोर उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर बुधवार (ता. २५) पासून राज्यभरातील अंगणवाड्या बंद ठेवून मुंबईतील आझाद मैदानासह राज्यभरातील जिल्हा परिषदांसमोर जेलभरो आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच रास्ता रोको, अन्नत्याग सत्याग्रह, धरणे आंदोलन करणार आहेत.

महिलांना आणण्याची सूचना

सोलापुरात बुधवारी (ता. २५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यावर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी बहिष्कार घालणार आहेत. तसे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिले आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील महिलांना आणण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

निर्णयाअभावी असंतोष

लाडकी बहीण योजनेच्या अर्ज नोंदणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच त्या योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात सहभागही नोंदविला आहे. या समारंभात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतचा शासकीय निर्णय लवकर काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीची लवकरच आचारसंहिता लागू होणार असल्याने आणि अद्याप आदेश न निघाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागल्‍याचे निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आपण PM मोदींसोबत आहोत हेच विसरले बायडेन; फजितीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Duleep Trophy: अर्शदीपच्या ६ विकेट्स अन् श्रेयस अय्यरच्या संघाने चाखली विजयाची चव, पण फायदा होणार ऋतुराजच्या संघाला?

Pitru Paksha 2024 :  नदी, घर, झाडं आणखी बरंच काही…! कुठे कुठे करू शकतो पितृपक्षात पिंडदान?

Latest Maharashtra News Live Updates: आमचे एक तत्व आहे की, जर आपल्याला शांततेने जगायचे असेल, तर आपले शेजाऱ्यांशी चांगले संबंध असले पाहिजेत- राजनाथ सिंह म्हणतात

Electricity Saving Tips : वाढत्या वीज बिलांमुळे हैराण आहात? या भन्नाट ट्रिकने खर्च होईल निम्मा

SCROLL FOR NEXT