भोसरे (ता. माढा) येथील पाच घरांवर सशस्त्र दरोडा पडला आहे. या घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडल्या.
कुर्डुवाडी (सोलापूर) : भोसरे (ता. माढा) (Madha Taluka) येथे चार अज्ञात चोरट्यांनी तीन घरांमध्ये जबरदस्तीने घुसून मारहाण करत सुमारे सव्वा लाख रुपयांची जबरी चोरी (Theft) केली. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. या घटना मंगळवारी (ता. 5) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडल्या. दत्तात्रेय शिवाजी बागल (वय 48, रा. बागल वस्ती, भोसरे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात (Kurduwadi Police Station) गुन्ह्याची (Crime) नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी हे आपल्या कुटुंबासमवेत जेवण करुन घरामध्ये झोपले होते. पहाटेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी दरवाजा जोरात ढकलून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या हातात लाकडी काठी, तलवार आणि घाव होते. त्यापैकी एकाने फिर्यादीच्या हातावर लाकडी काठीने मारहाण केली. दुसऱ्याने तलवारीने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या हाताच्या करंगळी जवळील बोटाला इजा झाली. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले. फिर्यादीच्या पत्नीचे दीड तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याचे कानातील टॉप्स , फुले व चांदीचे पैंजण जबरदस्ती काढून घेतले. फ्रिजवर असलेले मोबाईल, लॅपटॉप आपटून फोडले.
नंतर घराला बाहेरून कडी लावून समोरच काही अंतरावर असलेल्या फिर्यादीच्या वडिलांच्या घरात जबरदस्तीने घुसून आई, वडिलांना काठीने मारून जखमी केले. त्यांच्याजवळील रोख रक्कम व वडिलांची सोन्याची अंगठी, अर्धा तोळ्याची बोरमाळ, डोरले, मणी, कानातील फुले चोरून नेले. यामध्ये एकूण 1 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून ते चारही जण त्यांच्या मोटारसायकलवर रेल्वेच्या बाजूकडील रस्त्याने निघून गेले. चोरट्यांनी तेथून काही अंतरावर असणाऱ्या मनोहर बागल यांच्या घरीही चोरी केली.
ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली असून, श्वानपथकांना पाचारण करण्यात आले होते. तपासासाठी कुर्डुवाडी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.