Lok Sabha Poll 2024 Sakal
सोलापूर

Lok Sabha Poll 2024 : काँग्रेससह भाजपचेही मतदान वाढल्याने चुरस; दोन्ही पक्षांकडून लीड मिळण्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पद्मशाली आणि मुस्लिम बांधवांचे मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची ही पहिलीच निवडणूक होती. दहा वर्षात लोकसभेला भाजप तर विधानसभेला काँग्रेस असे चित्र होते. यंदा मात्र दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतदारांनी भरभरून मतदान केल्याने लिड मिळण्याचा दावाही दोन्ही पक्ष करत आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार टी. राजा यांच्या सभेनंतर पद्मशाली बांधवांमध्ये एक चैतन्याची ऊर्जा पाहायला मिळाली. ती ऊर्जा मतदानापर्यंत कायम होती. तितक्याच ताकदीने एमआयएएम, लालबावटा काँग्रेसच्या पाठिशी भक्कमपणे उभी असल्याचे दिसून आले.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पद्मशाली, मुस्लिम या समाजाचा वर्चस्व अधिक आहे. ’जो राम को लाये हम उनको लायेगें’चा नारा केवळ याच भागात ऐकायला मिळाला. पद्मशाली समाजाची ताकद अधिक असली तरी पद्मशाली समाज नेत्यांमध्ये विभागाला गेला आहे.

मागील दोन लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला या मतदारसंघातून ७० ते ७५ हजार मतदान तर काँग्रेसला ५० ते ५० हजार मतदान झाले. यंदाची परिस्थिती वेगळी आहे. भाजप विरुद्ध एआयएएम, लालबावटा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित अशी लढत झाली आहे.

त्यातच आमदार प्रणिती शिंदेचा मतदारसंघ असल्याने काँग्रेसचे पारडे जड आहे. विधानसभेला या ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होतात. त्यात आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित असतो. विधानसभेला बहुतांश पद्मशाली समाज हा काँग्रेसच्या पाठिशी असतो. त्यामुळे यंदाचे चित्र वेगळे असले तरी दोन्ही पक्षांनी विजय दावा केला आहे.

२०२४ अंतिम मतदान

एकूण मतदान ः ३२५६४९

झालेले मतदान ः १८४०२९

पुरुषांचे मतदान ः ९५०३६

महिलांचे मतदान ः ८८९७४

इतर मतदान ः १९

टक्केवारी ः ५६.५१

लोकसभा २०१९ ची स्थिती

भाजप ः ८०८२३

कॉँग्रेस ः ४९९९४

वंचित ः २७४६८

२०१९ विधानसभा स्थिती

काँग्रेस ः ५१४४०

एमआयएम ः ३८७२१

अपक्ष ः ३००८१

काँग्रेस विजयी ः १२७१९

मतदारसंघातील नागरिकांनी लोकशाहीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला. अत्यंत चुरशीने मतदान झाल्याचे दिसून आले. लोकशाहीबद्दल नागरिक जागृत असल्याचे पाहायला मिळाले. परंतु अपेक्षित असा मतदानाचा टक्का वाढला नाही. तरीही जे कोणी निवडून येतील त्यांनी सोलापूरचा विकास साधावा.

- फारुक शाब्दी, शहराध्यक्ष, एमआयएएम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT