तात्या लांडगे
सोलापूर : यंदाच्या गणेशोत्सवात सोलापूर शहरातील एक हजार १७६ गणेशोत्सव मंडळे सामिल होतील, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील ज्या शहरात कधीच काही घडले नाही, तेथे जिवितहानी झाली आहे. त्यामुळे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यासाठी सर्वच गणेशोत्सव मंडळांनी जागरूक रहावून शांततेत व आनंदात उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.
मंगळवारी (ता. १२) पोलिस आयुक्तालयात डॉ. राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटी व मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. माने यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शांतता कमिटीच्या सदस्यांना सूचना केल्या.
यावेळी उपायुक्त दिपाली काळे, अजित बोऱ्हाडे, विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, प्रांजली सोनवणे, संतोष गायकवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरअभियंता लक्ष्मण चलवादी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहतूक निरीक्षक पल्लवी पांडव यांच्यासह महावितरण, धर्मादाय आयुक्तालयाचे अधिकारी व शहर वाहतूक शाखेचे, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
तसेच मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अमोल शिंदे, संकेत पिसे अश्विनकुमार नागणे, मनोज देवकर, विनायक महिंद्रकर, श्याम कदम, संजय साळुंखे, विठ्ठल कोटा आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र भंडारे, विजय पुकाळे, श्रीकांत घाडगे, दास शेळके, सुनील रसाळे, लता फुटाणे, हेमा चिंचोळकर यांच्यासह आदींनी यावेळी सूचना मांडल्या. त्यावर अधिकार्यांनी उत्तरे दिली.
महापालिकेचे श्री.कारंजे म्हणाले...-मिरवणूक मार्गावर कोणताही अडथळा असणार नाही. शहरात १२ ठिकाणी विसर्जनाची सोय तर ४ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे
- मुर्ती कितीही उंच किंवा छोटी असू द्या, विष्णू घाट व गणपती घाट येथे विसर्जन करता येईल; खाणीत मुर्ती विसर्जन करताना विटंबना होणार नाही.
- धर्मवीर सांभाजी तलावात करता येणार नाही विसर्जन; कुंड स्वच्छ केले जातील. मिरवणूक मार्गावरील केबल काढल्या जातील. कचरा संकलन, मोकाट जनावरे त्रास होणार नाही. विसर्जनाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कार्यान्वित असतील
बैठकीतील ठळक मुद्दे...
विसर्जन झाल्यानंतर लगेच मंडप काढून घ्यावेत. अन्यथा आम्ही काढून घेऊ
मिरवणुकीच्या परवान्यासाठी अडचण आल्यास पोलिस ठाणे मदत करेल, पण परवाना ऑनलाइनच दिला जाईल
पोलिसांच्या मदतीने महापालिका मोकाट जनावरे सोडणार गोशाळेत; पोलिसांच्या दाखल्याशिवाय गोशाळेतून जनावरे बाहेर सोडू नयेत
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी वर्षातील ३६४ दिवस जनजागृती करावी; गणपती विसर्जनाच्या दिवशी वाद नको.
आपल्याला लेझीमची मोठी परंपरा; डिजेमुळे चिमुकल्यांसह ज्येष्ठांना त्रास होतो, आम्ही मनात आणले तर एक मिनिटात डिजे बंद करू शकतो. आवाजाची मर्यादा पाळावी, अन्यथा डिजे कायमचा जप्त होणार
गणपती मुर्ती विक्रीच्या ठिकाणी वॉकिंग ट्रक असणार; वाहने आत घेऊन जाता येणार नाहीत
सण- उत्सवाचे पावित्र्य राखावे. मिरवणुकीत कसलीही गाणी लावू नयेत
डिजिटल बॅनर अन् डिजेसंदर्भात आयुक्त म्हणाले....
शहरात अनधिकृतपणे डिजिटल लावले असल्यास त्याची तक्रार महापालिकेला करावी. त्याठिकाणी कारवाई करताना पोलिसांची मदत लागल्यास पोलिस आयुक्तालय मनुष्यबळ देईल. दरम्यान, आपण यापूर्वी शहरात डिजिटलमुक्त वातावरण निर्माण केले होते, पण कोणीतरी एकाने डिजिटल लावला आणि त्यानंतर आम्ही पण लावतो म्हणत सर्वत्र डिजिटल लागले.
कारवाई करताना काहीजण मंत्रालयातून फोन आणतात आणि मग कारवाई करण्यास अडचणी येतात. पण, आता परवानगी नसेल तेथे डिजिटल नको आणि जिथे लावायचा आहे, त्याठिकाणी नियमावलीचे पालन व्हावे व परवानगी बंधनकारक असेल, असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे म्हणाले, शहरातील डिजिटल लावण्यासंदर्भात नियोजन झाले असून ज्याठिकाणी डिजिटल लावण्यापूर्वी बॅनरचा आकार किती असावा, त्यावरील मजकूर कसा असेल, यासाठी मंजुरी घ्यावी लागेल.
कमानी, झेंडे, डिजिटल व पताका नकोच
गणेशोत्सव काळात कोणत्याही मंडळांनी मंडपाजवळ किंवा मिरणूक मार्गांवर कमानी, झेंडे, पताका, डिजिटल लावू नयेत. जे मंडळ लावणार आहे, त्यांनी सर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. कमानी, झेंडे पताका, डिजिटलसंदर्भात काहीतरी झाल्यास वाद होवू शकतो, त्यामुळे त्याला संबंतिध मंडळ जबाबदार राहील, असा इशाराही पोलिस आयुक्तांनी या बैठकीत दिला. वातावरण बिघडू नये म्हणून सर्वांनी जागरूक राहावे, असेही ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.